चाकू, ब्लेडसह मातोश्रीत शिरणारा नाभिक गजाआड

By Admin | Updated: August 8, 2015 01:58 IST2015-08-08T01:58:59+5:302015-08-08T01:58:59+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री बंगल्यात चाकू आणि ब्लेडच्या पाकिटासह शिरू पाहाणाऱ्या एका नाभिकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली.

Knife, moving nose with blade | चाकू, ब्लेडसह मातोश्रीत शिरणारा नाभिक गजाआड

चाकू, ब्लेडसह मातोश्रीत शिरणारा नाभिक गजाआड

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे निवासस्थान मातोश्री बंगल्यात चाकू आणि ब्लेडच्या पाकिटासह शिरू पाहाणाऱ्या एका नाभिकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. राम मिलन शर्मा (५४) असे त्याचे नाव असून तो चेंबूरचा रहिवासी आहे. शिवसेनेत दाखल झालेले नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या समर्थकांसोबत शर्माही मातोश्रीवर जात होता, तेव्हा ही कारवाई झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
खेरवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलानगरच्या प्रवेशद्वारावर मातोश्रीत जाणाऱ्यांची झाडाझडती घेतली जाते. दुपारी बाराच्या सुमारास शिवसैनिक मोठया संख्येने मातोश्रीवर आले होते. प्रत्येकाची झाडाझडती घेत असताना शर्माच्या शिखात चाकू आढळला. बंदोबस्तावर तैनात असलेल्या पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्यानेही मी नाभिक आहे, माझ्याकडे ब्लेडही आहे, असे म्हणत ब्लेडचे पाकिट काढून दाखवले. त्यामुळे पोलीस आणखी सतर्क झाल आणि त्याला अटक केली. त्याची चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ निरिक्षक सुजाता पाटील यांनी सांगितले. नारायण राणेंचे कटटर समर्थक अशी ओळख असलेले पाटणकर यांनी शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी सकाळी आपल्या प्रभागातील कार्यकर्त्यांसह ते मातोश्रीवर आले होते. परंतु शर्मा आपला कार्यकर्ता नसल्याचे पाटणकर यांनी सांगितले.

Web Title: Knife, moving nose with blade