गर्दुल्ल्याचा महिला प्रवाशावर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2016 04:40 IST2016-07-18T04:40:51+5:302016-07-18T04:40:51+5:30

सायन रेल्वे स्थानकात एका गर्दुल्लयाने रविवारी रात्री २३ वर्षीय तरुणीच्या मानेवर चाकूने वार करण्याची घटना घडली.

A knife attack on Garandulla woman passenger | गर्दुल्ल्याचा महिला प्रवाशावर चाकू हल्ला

गर्दुल्ल्याचा महिला प्रवाशावर चाकू हल्ला


मुंबई : सायन रेल्वे स्थानकात एका गर्दुल्लयाने रविवारी रात्री २३ वर्षीय तरुणीच्या मानेवर चाकूने वार करण्याची घटना घडली. यात तरुणी जखमी झाली असून तिला तात्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. आरोपी गर्दुल्ल्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली.
२३ वर्षीय पुष्पा पाखरे ही कुर्ला ट्रेन स्थानकात आली असता महिला डब्यात चढण्याच्या तयारीत होत्या. त्याचवेळी डब्यात असलेल्या फिरोज युसूफ शेख या गर्दुल्ल्याने पुष्पा हिच्या मानेवर चाकूने वार केला. यात पुष्पा जखमी झाली. हे पाहताच अन्य प्रवाशांनी आरडाओरड केली आणि फिरोजला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
याआधीही लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांवर पहाटे तसेच रात्रीच्या वेळी हल्ले तसेच छेडछाड करण्याचे प्रकार घडले आहेत. या घटनांनंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक भर दिला जाईल, असे आश्वासन रेल्वे पोलिसांकडून देण्यात आले. मात्र त्यानंतरही महिला प्रवाशांवरील हल्ले आणि छेडछाडीच्या घटना घडतच
आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: A knife attack on Garandulla woman passenger