बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर येणार जप्ती
By Admin | Updated: September 16, 2016 21:15 IST2016-09-16T21:15:09+5:302016-09-16T21:15:09+5:30
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कृपाशंकर सिंह यांची संपत्ती जप्त करण्याला मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेशण विभागाला परवानगी

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर येणार जप्ती
>ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि.16- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. कृपाशंकर सिंह यांची संपत्ती जप्त करण्याला मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेशण विभागाला परवानगी दिल्याचं वृत्त आहे.त्यामुळे सिंग यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता आहे.
आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबत कारवाईसाठी परवानगी मागितली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला परवानगी दिली आहे. कृपाशंकर सिंग आणि त्यांच्या कुटुंबाने ज्ञात स्रोतापेक्षा 19.95 टक्के इतकी जास्त मालमत्ता जमविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.