किसन कथोरे यांचा राष्ट्रवादीला रामराम

By Admin | Updated: August 25, 2014 03:56 IST2014-08-25T03:56:41+5:302014-08-25T03:56:41+5:30

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला

Kisan Kathore's Nationalist Rama Ram | किसन कथोरे यांचा राष्ट्रवादीला रामराम

किसन कथोरे यांचा राष्ट्रवादीला रामराम

बदलापूर : मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार, कोकण पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष किसन कथोरे यांनी रविवारी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला. तसेच सोमवारी ते विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत.
पक्षात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी दिली जात नसल्याचा आरोप कथोरे यांनी आपल्या राजीनाम्यानंतर केला आहे. पक्ष स्थापनेपासून आपण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काम करीत असून गेल्या अनेक वर्षांत पक्षातील काही नेतेच आपल्याविरोधात भूमिका घेत आहेत. यासंदर्भात आपण नेहमी पक्षाकडे तक्रारदेखील केली होती. मात्र, त्या तक्रारींकडे कधीच गांभीर्याने पाहिले गेले नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. राजीनामा दिल्यावर पुढचा निर्णय काय घेणार, यावर मात्र ते काहीही बोलले नाहीत. आपण जनतेचे प्रतिनिधी असून लोकांमध्येच जाऊन आपण पुढचा निर्णय घेऊ, अशी भूमिका त्यांनी मांडली़ कथोरे हे २००५ मध्ये अंबरनाथ आणि २००९ मध्ये मुरबाड मतदारसंघातून निवडूून आले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kisan Kathore's Nationalist Rama Ram