शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रेडिट कार्ड: कर्ज घ्या फक्त दहा मिनिटांत! देशातील दोन जिल्ह्यांत प्रयोग; बीडचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 09:34 IST

महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येत आहे.

पुणे : किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकांकडून होणारा जाच आता कमी होणार आहे. केंद्र सरकारने देशातील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबविण्याचे ठरविले आहे. ॲग्री स्टॅक या ॲपच्या माध्यमातून केवळ एका क्लिकवर आणि दहा मिनिटांमध्येच दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून, ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या खात्यातही जमा होणार आहे. महाराष्ट्रातील बीड व उत्तर प्रदेशातील फारुखाबाद या जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प येत्या मेपासून राबविण्यात येत आहे.

राज्य सरकारच्या भूमी अभिलेख विभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून ई-पीक पाहणी अर्थात पिकांची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ॲप विकसित करण्यात आले आहे. याच ॲपच्या धर्तीवर केंद्र सरकारनेदेखील सबंध देशासाठी एकाच ॲपमधून पिकांची नोंदणी करण्याचे ठरविले असून, येत्या खरीप हंगामापासून देशभरात एकाच ॲपवर पिकांची नोंदणी केली जाणार आहे. ही नोंदणी शेतकऱ्यांनीच करावयाची असल्याने एकूण पीक क्षेत्राची अचूक नोंद होत आहे.

सातबारा उतारे जोडले ‘आधार’ला nपीएम किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न करण्यात आले आहे. तसेच, सर्व जमीन नोंदीही तपासण्यात येऊन त्याची सत्यता पडताळण्यात आलेली आहे. 

nई-पीक पाहणी व जमीन नोंदीच्या माहितीचा आधार घेऊन बीड व फारुखाबाद या दोन्ही जिल्ह्यांतील सातबारा उतारे आधार क्रमांकाशी संलग्न करण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात आतापर्यंत ६५ टक्के सातबारा उतारे ‘आधार’ला जोडण्यात आले आहेत. 

कर्ज देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी, या दृष्टीने केंद्र सरकारने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. येत्या मे महिन्यात या प्रकल्पाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे.- निरंजन कुमार सुधांशू, भूमी अभिलेख संचालक तथा जमाबंदी आयुक्त, पुणे

अशी असेल प्रक्रियाॲप डाऊनलोड केल्यानंतर नाव आणि आधार क्रमांक टाकल्यावर ओटीपीतून पडताळणी होईल. फेस आयडीच्या माध्यमातून शेतकऱ्याची खात्री पटविण्यात येईल. शेतकऱ्याला कर्ज हवे असल्यास तशी माहिती भरून खाते असलेल्या बँकांच्या कर्जाची ऑफर  दिसेल. एक ऑफर स्वीकारून दहा मिनिटांत प्रक्रिया करून कर्ज जमा होईल. किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक लाख साठ हजारपर्यंतच्या कर्जाला कोणतेही तारण लागत नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र