शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

ही देशाशी गद्दारी! राऊतांनी काढली 'INS विक्रांत फाईल'; सोमय्यांच्या अडचणीत भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 12:25 IST

काश्मीर फाईल पाहून झाली असेल तर आता विक्रांत फाईल बघा; राऊतांचं मोदी, शाह यांना आवाहन

मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली गोळा केलेल्या रकमेचं काय झालं, ती रक्कम कुठे गेली, असे प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले आहेत. सोमय्यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचं आरटीआयमधून समोर आलं आहे. लोकांच्या देशप्रेमाशी खेळून सोमय्यांनी गद्दारी केलं आहे. या गंभीर प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनी करावा, असं आवाहन राऊत यांनी केलं. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या निधीचं काय झालं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण तो देशाच्या सुरक्षेशी संबंधित आहे. लोकांनी मोठ्या विश्वासानं विक्रांत वाचवण्यासाठी देणगी दिली. त्या निधीचं काय झालं, याचं उत्तर लोकांना मिळायला हवं. सध्या भाजपचं कार्यालय झालेल्या राजभवनानं आपल्याला सोमय्यांकडून कोणताच निधी किंवा चेक मिळाला नसल्याचं म्हटलं आहे. त्याची कागदपत्रं माझ्याजवळ आहेत. या विक्रांत फाईल्स काश्मीर फाईल्सपेक्षा गंभीर आहेत, असं राऊत म्हणाले. सोमय्यांनी ५८ कोटी रुपये लाटल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.

विक्रांतच्या नावाखाली गोळा केलेल्या पैशांचा सोमय्यांनी घोटाळा केल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केला. सोमय्यांनी देशाशी गद्दारी केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. राज्याच्या हद्दीत हा गुन्हा घडल्यानं राज्यातील तपास यंत्रणांनी कारवाई करायला हवी. देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असल्यानं केंद्रीय तपास यंत्रणांनीदेखील तपास करायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं.

२०१३ मध्ये विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी मोहीम सुरू केली. केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थतता दर्शवल्यानं महात्मा सोमय्या पुढे आले आणि निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबा घेऊन उभे राहिले. विक्रांत देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्यानं लोकांनी सढळ हस्ते दान केलं. नेव्हीनगरमध्ये राहणाऱ्या नौदलाच्या अनेक अधिकाऱ्यांनी प्रत्येकी ५ ते १० हजार रुपये दिले. या रकमेचं सोमय्यांनी काय केलं ते देशाला समजायला हवं, असं राऊत म्हणाले. सोमय्यांनी गोळा केलेला पैसा राजभवनात जमा झाला नाही, मग तो कोणाच्या खिशात गेला? हा पैसा कोणी खाल्ला? तो खाऊन कोणी ढेकर दिला? अशी प्रश्नांची सरबत्तीच राऊत यांनी केली.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा