शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

सोमय्या व्हिडीओ प्रकरण: राज्य महिला आयोगाने घेतली दखल; मुंबई पोलिसांना दिले 'हे' निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2023 20:33 IST

सोमय्या व्हिडीओ प्रकरणात आता नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत

Kirit Somaiya Controversy: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली आहे. सोमवारी ही व्हिडीओ क्लिप एका वृत्तवाहिनीने दाखवली. त्यानंतर याचे पडसाद उमटू लागले. या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, पोलिसांकडून या व्हिडिओ प्रकरणी तपास सुरू आहे. यामध्ये जवळपास ८ तासांच्या ३५ व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची आता राज्य महिला आयोगानेही दखल घेतली असून पोलिसांनी महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे.विविध सामाजिक संस्थाकडून सदर व्हिडिओ बाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे. तरी उपरोक्त प्रकरणी चौकशी करून  वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत, असे ट्विट करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीवर एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली. अशा प्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत. तसेच, अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत असेही दावे केले जात आहेत. मात्र माझ्याकडून कोणत्याही महिलेवर असे अत्याचार झालेले नाहीत असे किरीट सोमय्या यांनी पत्रात लिहिले आहे. अशा सर्व आरोपांची, तसेच व्हिडिओ क्लिपची सत्यता तपासून चौकशी करावी, अशी विनंतीही किरीट सोमय्या यांनी केली आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याRupali Chakankarरुपाली चाकणकरMaharashtraमहाराष्ट्रMumbai policeमुंबई पोलीस