अंबाबाई मंदिरात उद्यापासून किरणोत्सव
By Admin | Updated: November 8, 2014 00:23 IST2014-11-08T00:21:05+5:302014-11-08T00:23:45+5:30
प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या व देशभरातील भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय

अंबाबाई मंदिरात उद्यापासून किरणोत्सव
कोल्हापूर : मंदिररचना व स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात रविवार (दि. ९) पासून किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. जानेवारी महिन्यात दाट धुके व सूर्यकिरणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने किरणोत्सव होऊ शकला नव्हता. त्या पार्श्वभूमीवर रविवारपासून सुरू होत असलेल्या या सोहळ्याबद्दल भाविकांत उत्सुकता आहे.
प्राचीन वास्तुशास्त्राचा अजोड नमुना असलेल्या व देशभरातील भाविकांसाठी औत्सुक्याचा विषय असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जानेवारी ३०, ३१ ते १ फेब्रु्रवारी, तसेच ९, १०, ११ नोव्हेंबर असा वर्षातून दोनदा किरणोत्सव होतो.
जानेवारी महिन्यात दाट धुक्याच्या अडथळ्यामुळे अंबाबाईचा किरणोत्सव झाला नाही. पहिल्या दिवशी किरणे गाभाऱ्याच्या पायरीशी येऊन लुप्त झाली होती. दुसऱ्या दिवशी किरणांनी कसाबसा चरणस्पर्श केला होता, तर तिसऱ्या दिवशीही किरणे पायरीशी येऊन लुप्त झाल्याने भाविकांना निराशेनेच परतावे लागले. त्यामुळे यावेळी तरी किरणोत्सव होईल का, याची भाविकांत उत्सुकता आहे.