किरणे अंबाबाईच्या कंबरेपर्यंत पोहोचली
By Admin | Updated: November 12, 2014 23:29 IST2014-11-12T23:19:23+5:302014-11-12T23:29:15+5:30
काही क्षण ही स्थिती राहिल्यानंतर किरणे बाजूला सरकली

किरणे अंबाबाईच्या कंबरेपर्यंत पोहोचली
अंबाबाई मंदिरात याहीवर्षी किरणोत्सव झाला नाही; मात्र आज, बुधवारी किरणोत्सवाचा प्रयोग म्हणून किरणे मूर्तीपर्यंत पोहोचतात का, याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये किरणे अंबाबाईच्या कंबरेपर्यंत पोहोचली.
गेले तीन दिवस या ना त्या कारणांनी किरणांनी भाविकांची घोर निराशा केली होती. आज मात्र सूर्यकिरणे देवीच्या कंबरेपर्यंत पोहोचली. किरणांनी ५.०३ मिनिटांनी पश्चिम दरवाजातून मंदिरात प्रवेश केला. ५.३९ मिनिटांनी किरणांनी पहिली पायरी पार केली, तर पितळी उंबरा ५. ४० मिनिटांनी पार केला. अखेर ५.४४ वाजता किरणे करवीरनिवासिनीच्या कंबरेपर्यंत पोहोचली. काही क्षण ही स्थिती राहिल्यानंतर किरणे बाजूला सरकली. तिरूमला तिरूपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.जी. गोपाल यांनी आज सहपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत तिरूपतीचे पुजारी गुरुराज हेही उपस्थित होते.