अहमदनगरमध्ये खंडणीसाठी तरुणाची हत्या
By Admin | Updated: February 28, 2017 13:53 IST2017-02-28T13:53:07+5:302017-02-28T13:53:07+5:30
खंडणीसाठी एका 18 वर्षांच्या तरुणाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमदनगरमध्ये खंडणीसाठी तरुणाची हत्या
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 28 - खंडणीसाठी एका 18 वर्षांच्या तरुणाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगरमधील श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलु येथील ही घटना आहे.
अक्षय पानवळकर असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अपहणकर्त्यांनी 20 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी अक्षयच्या कुटुंबीयांकडे केली होती.
मात्र, खंडणी न मिळाल्याने अपहरणकर्त्यांनी अक्षयच्या डोक्यात वार करत त्याची हत्या केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने 5 जणांना अटक केली आहे. आरोपी काष्टी, निमगाव खलु आणि पुण्यातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे.