भिवंडीत काँग्रेस गटनेत्याची हत्या
By Admin | Updated: February 14, 2017 23:52 IST2017-02-14T23:40:58+5:302017-02-14T23:52:13+5:30
महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवाल वाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला

भिवंडीत काँग्रेस गटनेत्याची हत्या
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 14 - महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे यांची मंगळवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवाल वाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
म्हात्रे हे घरी परतत असताना मोटारसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी प्रथम गोळीबार केला. आणि मग पाठलाग करून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. यात त्यांच्या पंज्याला इजा झाली. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.