प्रियकराच्या मदतीने हत्या
By Admin | Updated: April 27, 2017 01:49 IST2017-04-27T01:49:36+5:302017-04-27T01:49:36+5:30
अज्ञात व्यक्तींनी पतीची गळा आवळून हत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केल्याच्या

प्रियकराच्या मदतीने हत्या
वसई : अज्ञात व्यक्तींनी पतीची गळा आवळून हत्या केल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीला तिच्या प्रियकरासह पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली वालीव पोलिसांनी अटक केली आहे. अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याने पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उजेडात आले आहे. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गवराई पाडा येथील गुप्ता चाळीत शशिकांत कदम, पत्नी सिद्धी कदम आणि आपल्या दोन मुलांसह राहत होते. मंगळवारी पहाटे शशिकांत कदम यांची अज्ञात व्यक्तींनी हत्या केल्याचा बनाव सिद्धीने केला होता. (प्रतिनिधी)