गणेशभक्तांवर काळाचा घाला, चिपळूणजवळ बस अपघातात एक ठार

By Admin | Updated: August 27, 2014 09:52 IST2014-08-27T09:21:40+5:302014-08-27T09:52:29+5:30

बोरिवली - साखरपा एसटी बसला चिपळूणजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे.

A killer in the Ganesh devotees, one killed in a bus accident near Chiplun | गणेशभक्तांवर काळाचा घाला, चिपळूणजवळ बस अपघातात एक ठार

गणेशभक्तांवर काळाचा घाला, चिपळूणजवळ बस अपघातात एक ठार

ऑनलाइन टीम

चिपळूण, दि. २७ - गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांवर बुधवारी सकाळी चिपळूणजवळ काळाने घाला घातला. बोरिवलीहून साखरपा येथे जाणा-या एसटी बसला वालोपेजवळ भीषण अपघात झाला असून या अपघातात एक प्रवासी ठार तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

बोरिवली - साखरपा ही बस मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास बोरिवली आगारातून निघाली होती. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास चिपळूणजवळील वालोपेजवळ बस उलटली. या अपघातात एक प्रवासी ठार झाला आहे. तर जखमी प्रवाशांवर स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र एकीकडे कोकण रेल्वेने दगा दिला असतानाच आता एसटी बसलाही अपघात होत असल्याने कोकणात जाणारे चाकरमानी हवालदील झाले आहेत. 

Web Title: A killer in the Ganesh devotees, one killed in a bus accident near Chiplun