किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी
By Admin | Updated: August 17, 2016 04:14 IST2016-08-17T04:14:48+5:302016-08-17T04:14:48+5:30
हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणाचा अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) सखोल तपास करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी ईडीने मुंबई

किडनी रॅकेट प्रकरणी ईडीही करणार चौकशी
मुंबई : हिरानंदानी किडनी रॅकेट प्रकरणाचा अंमलबजावणी संचालनालयाकडूनही (ईडी) सखोल तपास करण्यात येत आहे. याबाबत अधिक तपास करण्यासाठी ईडीने मुंबई पोलिसांकडून गुन्ह्यांची कागदपत्रे मागविली आहेत. या रॅकेटमधून मनी लॉड्रिंगच्या
दिशेने ईडीकडून तपास करण्यात येत आहे.
या गुन्ह्यांत हिरानंदानी रुग्णालयाच्या पाच डॉक्टरांना अटक झाल्यानंतर या गुन्ह्यांचे गांभीर्य आणखीनच वाढले. तसेच या प्रकरणाचा सखोल तपास करत ईडी मनी लॉड्रिंग अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्याच्या तयारीत आहेत. मात्र यामध्ये जर पोलीस अथवा सीबीआयने पैशांच्या देवाणघेवाणीचा गुन्हा दाखल केला असेल तरच ईडी
हा गुन्हा नोंदवू शकते. त्यामुळे यामध्ये दाखल गुन्हा, त्यातील
डॉक्टर आणि रुग्णालयाच्या कनेक्शनचा अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान झालेल्या पैशांचा व्यवहार, त्यामधील सहभागांची पाळेमुळे खणून काढण्याचा ईडीचा प्रयत्न असणार आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)