तीन शाळकरी मुलांचे नगरमध्ये अपहरण
By Admin | Updated: March 13, 2016 04:54 IST2016-03-13T04:54:24+5:302016-03-13T04:54:24+5:30
एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

तीन शाळकरी मुलांचे नगरमध्ये अपहरण
अहमदनगर : एका खासगी क्लासला जाणाऱ्या तीन शाळकरी मुलांचे शुक्रवारी दुपारी एक वाजता शहरातील महाजन गल्लीतून अपहरण झाले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तेजस संभाजी निमसे (१४, रा. मांडवे, ता. नगर), अभिषेक चंद्रकांत म्याना (१४, रा. भराडगल्ली, तोफखाना) आणि विशाल रवींद्र जाधव (१४, रा. पानसरे गल्ली, अर्बन बँक चौक) असे अपहरण झालेल्या मुलांची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी ही मुले हरवली असल्याची तक्रार तेजसचे
वडील संभाजी निमसे यांनी
कोतवाली पोलिसांकडे केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. मुले हरवली की त्यांचे अपहरण झाले, याचा पोलीस शोध घेत आहेत.
तेजस हा शाळेसाठी नगर-मांडवे असा बसमधून प्रवास करतो. अन्य दोन मुले नगरची आहेत. तिघेही खासगी क्लासला पायी जात असताना त्यांचे अपहरण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)