खूशखबर....५००च्या ५० लाख नव्या नोटा आल्या नाशिक प्रेसमधून
By Admin | Updated: November 13, 2016 11:56 IST2016-11-13T10:56:34+5:302016-11-13T11:56:11+5:30
चलनाच्या कमतरतेने गेले पाच दिवस नागरिक बँक आणि एटीएम बाहेर रांगेत उभे राहून त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाकडून दिलासा देणारी बातमी आली आहे.

खूशखबर....५००च्या ५० लाख नव्या नोटा आल्या नाशिक प्रेसमधून
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. १३ - चलनाच्या कमतरतेने गेले पाच दिवस नागरिक बँक आणि एटीएम बाहेर रांगेत उभे राहून त्रस्त असताना नाशिकमधील प्रतिभूती मुद्रणालयाकडून दिलासा देणारी बातमी आली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार नाशिक प्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ५०० रुपयांच्या नव्या नोटेची पहिली खेप पाठवली आहे. शनिवारी रात्री उशीरा नाशिक प्रेसने ५०० रूपयांच्या ५० लाख नव्या नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाठवल्या आहेत.
हाती आलेल्या वृत्तानुसार पाचशे रूपयांच्या नोटांच्या या पहिल्या खेपेनंतर बुधवारी अजून ५०० रूपयांच्या ५० लाख नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला नाशिक प्रेसकडून पाठवण्यात येणार आहेत. याबरोबरच, नाशिक प्रेसकडून, २०, ५० आणि १०० रूपयांच्या नोटा छापण्याची संख्या वाढवण्यात आली आहे. देशात असणाऱ्या नऊ नोट छापण्याच्या कारखान्यापैकी नाशइक येथिल एक कारखाना आहे.
नवीन पाचशेची नोट ही रद्द केलेल्या ५00 च्या नोटेपेक्षा कमी आकाराची राहणार आहे. यापूर्वी एक शीटमध्ये ५00 च्या ३६ नोटा छापल्या जात होत्या. आता नवीन पाचशेच्या नोटेचा आकार कमी केल्याने एका शीटमध्ये ५0 नोटा छापल्या जात आहे. पूर्वीच्या नोटेमध्ये उजव्या बाजूला असलेला गांधीजींचा फोटो आता नवीन नोटेमध्ये कमी आकारात डाव्या बाजूला राहणार आहे. तर नोटेमधील वॉटरमार्क आता उजव्या बाजूला राहणार आहे. नोटेवर छापलेल्या क्रमांकाच्या जागेतदेखील बदल करण्यात आला आहे.