खारघर टोलनाका ठरवला वैध!
By Admin | Updated: January 31, 2015 05:38 IST2015-01-31T05:38:19+5:302015-01-31T05:38:19+5:30
नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली

खारघर टोलनाका ठरवला वैध!
मुंबई : नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली.
मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी हा दावा केला़ हा टोल सुरू करताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही़ सर्व परवानग्या घेऊनच याची उभारणी झाली आहे व याचा तपशील प्रतिज्ञापत्रावर दिला जाईल़ हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी अॅड़ वग्यानी यांनी केली़ ती
ग्राह्य धरत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी ही सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब केली़
सीबीडी बेलापूर येथील प्रोफेसर अभिलाषकुमार त्रिपाठी यांनी जनहित याचिका केली आहे़ तसेच सायन-पनवेल टोलवेज् प्रायव्हेट कंपनीने या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. येथील रस्त्याचे काम करण्याआधी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक होते़ ही परवानगीही घेतलेली नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)