खारघरचा टोल स्थानिकांना माफ

By Admin | Updated: July 13, 2014 02:18 IST2014-07-13T02:18:43+5:302014-07-13T02:18:43+5:30

खारघर टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमुक्त करण्याचे मान्य केलेच, त्याचबरोबर खारघर टोल नाकाच रद्द करण्याचे संकेत दिले.

Kharghar toll locales excused | खारघरचा टोल स्थानिकांना माफ

खारघरचा टोल स्थानिकांना माफ

टोलनाकाच रद्द करण्याच्या हालचाली : 
मुख्यमंत्री चव्हाण यांनी बैठकीनंतर दिले संकेत
पनवेल : जनआंदोलनाची दखल घेत शनिवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खारघर टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमुक्त करण्याचे मान्य केलेच, त्याचबरोबर खारघर टोल नाकाच रद्द करण्याचे संकेत दिले. यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी दिल़े
खारघर टोल नाक्यासंदर्भात आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. टोलविरोधात जनआंदोलन उभारणारे आ.  प्रशांत ठाकूर यांना या बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित केले. ते म्हणाले, या टोल पनवेलकर पूर्वीपासून हा रस्ता वापरत आहेत़ त्यांना वेगवेगळ्या कामानिमित्त कोकण भवनला जावे लागते. त्याचबरोबर खारघरवासीयांना शासकीय कार्यालय, शाळा, रुग्णालयात जावे लागते. कधी-कधी दिवसातून दोन-तीन वेळा फे:या माराव्या लागतात. हा टोल स्थानिकांवर अन्यायकारक असून त्यामधून आम्हाला सूट मिळालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच वाशी टोल नाका अगदी जवळ असताना खारघरला टोलवसुली का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांनी बांधकाम विभागाचे म्हणणो मांडा, अशा सूचना सचिव नाईक यांना दिल्या. त्यांनी हा टोल नाका एका महिन्यात बांधण्याच्या सूचना ठेकेदाराला दिल्या होत्या़ मात्र, हे काम पूर्ण झाले नाही. त्याचबरोबर आणखी दोन पुलांचे काम अपूर्ण आह़े त्यामुळे किमान दोन महिने तरी पथकर आकारला जाणार नसल्याचे सांगितले. त्यानुसार, मुख्यमंत्री चव्हाण यांनी आ. ठाकूर यांची स्थानिकांना सूट मिळावी, ही मागणी रास्त आहेच, त्याचबरोबर टा टोल नाकासुद्धा चुकीचा असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याची कबुली दिली. त्यामुळे हा टोल नाका रद्द करून ठेकेदाराने खर्च केलेल्या पैशांचा परतावा करण्याच्या दृष्टीने विचार करावा लागणार आहे. त्याकरिता, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात येईल आणि त्याचा अहवाल आल्यानंतर लागलीच निर्णय घेण्याचे चव्हाण यांनी सांगितले. जनतेचे मत विचारात घेऊनच निर्णय घेण्यात येईल. पथकर कोणावरही लादण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सिडको आणि एमएमआरडीएने 12क्क् कोटी रुपयांचा खर्च उचलून हा महामार्ग टोल फ्री करण्याचा मुद्दा कामगार नेते महेंद्र घरत यांनी उपस्थित केला. हा परतावा कसा करायचा, याबाबत समिती आपला अहवाल देईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी सांगितले. समितीमध्ये अर्थ, बांधकाम  सचिवांबरोबर आमदार प्रशांत ठाकूर यांचाही समावेश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री गणोश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. (वार्ताहर )
 
टोल नाक्यावर जल्लोषाचा पाऊस 
मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांनाच नाहीतर खारघरचा टोल नाकाच रद्द करण्याचे संकेत दिल्याने सायंकाळी खारघर टोलनाक्यावर स्थानिकांनी जल्लोष केला. 
सोशल मीडियाही टोल फ्री  
खारघर टोल नाक्याचे आंदोलन सोशल मीडियाने गाजवले. या माध्यमातून काँग्रेस पक्षाने आंदोलन उभे केले. आज या आंदोलनाला यश मिळाल्यानंतर व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर टोल फ्रीचा  संदेश फिरत होता.
 
च्ठाणो-पनवेल मार्गावरील मुंब्रा येथील टोल नाक्यावर टोलवसुली करण्यास मुदतवाढ देण्याची मेसर्स अटलांटा कंपनीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आह़े त्यामुळे येत्या 21 सप्टेंबरपासून येथील टोलवसुली बंद होऊन यामार्गे प्रवास करणा:या ठाणो व मुंबईकरांची यातून सुटका झाली आह़े
च्या कंपनीला 1999 मध्ये मुंब्रा बायपास बांधण्याचे काम बांधा, वापरा व हस्तांतरित करा, या तत्त्वावर दिले गेल़े त्याची मुदत सहा वर्षाची होती़ मात्र, या कामात दोष आढळल्याने शासनाने रस्ता दुरुस्तीचे कंपनीला निर्देश दिल़े त्याचा आधार घेत कंपनीने टोलवसुलीची मुदत 24 वर्षे वाढवण्याची मागणी केली़ सरकारने विरोध केल्यानंतर कंपनीने उच्च न्यालयालत धाव घेतली होती. 

 

Web Title: Kharghar toll locales excused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.