‘लोकमत’च्या खरोटे व शिंदे यांना पत्रकारिता पुरस्कार

By Admin | Updated: March 2, 2016 03:24 IST2016-03-02T03:24:12+5:302016-03-02T03:24:12+5:30

राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या २०१५ वर्षाच्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली

Kharats of 'Lokmat' and 'Shinde' were given the journalistic award | ‘लोकमत’च्या खरोटे व शिंदे यांना पत्रकारिता पुरस्कार

‘लोकमत’च्या खरोटे व शिंदे यांना पत्रकारिता पुरस्कार

मुंबई : राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत दिल्या जाणाऱ्या २०१५ वर्षाच्या पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार लोकमत नाशिकचे प्रशांत खरोटे यांना तर पुणे विभागातून नानासाहेब परुळेकर पुरस्कार लोकमतच्या सुषमा नेहरकर-शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे. ४१ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आला. हे पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Kharats of 'Lokmat' and 'Shinde' were given the journalistic award