खानविलकर म्हणजे दूरदृष्टीचे नेतृत्व..
By Admin | Updated: November 29, 2014 22:28 IST2014-11-29T22:28:59+5:302014-11-29T22:28:59+5:30
रायगड जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रची नेमकी नस ओळखलेले एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅड. दत्ताजी खानविलकर.

खानविलकर म्हणजे दूरदृष्टीचे नेतृत्व..
जयंत धुळप ल्ल अलिबाग
रायगड जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रची नेमकी नस ओळखलेले एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे अॅड. दत्ताजी खानविलकर. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत 1942च्या स्वातंत्र्यलढय़ातून उदयास येऊन काँग्रेसच्या पुरोगामी विचारधारेत तयार झालेले दत्ताजी तथा भाऊ खानविलकर यांचे आयुष्य म्हणजे एक संघर्षपर्वच होते. भाऊंच्या संघर्षपर्वातून अलिबागचा त्या काळात झालेला ‘विकास’ त्या नंतरच्या काळात तसा कधीही झाला नाही, हे वास्तव अलिबागकर अनुभवत आहेत.
1955 मध्ये भाऊ अलिबाग नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत प्रथमच नगरसेवक म्हणून निवडून आले. त्या वेळचे नगराध्यक्ष विष्णू नारायण टिल्लू तथा टिल्लू सर यांनी राजीनामा दिला व भाऊ नगराध्यक्ष झाल़े त्यानंतर 1957 मध्ये सर्वत्र संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अत्यंत वेगाने सुरू होती. भाऊ या चळवळीचे एक सक्रिय कार्यकर्ते होते. 1957 मध्ये अलिबाग नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. भाऊ पुन्हा निवडून आले. काँग्रेसला बहुमत मिळून भाऊ पुन्हा नगराध्यक्ष झाले. भाऊ सलग 12 वर्षे अलिबागचे नगराध्यक्ष होते.
अखेर भाऊंनी वीज आणली
भूचुंबकीय वेधशाळेच्या संशोधक आणि शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यामागील नेमकी शास्त्रीय मीमांसा जाणून घेतली. शास्त्रीय कारणमीमांसेचा अभ्यास भाऊंनी केल्यावर त्यांच्या लक्षात आले, की सरकारमध्ये मोठा गैरसमज आहे. अलिबागेत वीज आली तर वेधशाळेच्या नोंदीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही आणि मग सरकारची मानसिकता अलिबागमध्ये वीज आणण्याकरिता सकारात्मक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. तत्कालीन मुंबई राज्याचे नियोजन मंत्री स्व. आर. ए. वानखेडे यांच्याशी या मुद्दय़ावर चर्चा करून त्यांना भाऊंनी थेट अलिबागेत आणले आणि सारी वस्तुस्थिती समजावून सांगितली. त्यानुसार मागवलेल्या अहवालात अलिबागेत वीज आल्यास वेधशाळेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे निष्पन्न झाले आणि भाऊंचे तब्बल पाच वर्षाचे प्रयत्न व अथक पाठपुरावा फळास आला आणि 1962 मध्ये अलिबाग शहरात वीज आली.
कल्पक, चिरकालीन नियोजन
भविष्याचा वेध घेऊन कल्पक आणि चिरकाल उपयुक्त ठरेल, असे नियोजन करणो हे भाऊंचे एक वैशिष्टय़ होते. त्या काळात अलिबाग शहरात विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येत असे. समुद्रकिना:याच्या भागातील या शहरातील विहिरींचे पाणी अत्यंत मचूळ होते. पिण्याचे पाणी चांगले नाही, या कारणास्तव अनेक सरकारी अधिकारी त्या काळात रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असणा:या अलिबागेत बदलीवर येण्यास तयार नसत. आलेच तर सहा - आठ महिन्यांत आपली बदली करून घेत. या वेळी भाऊंनी अलिबाग शहरवासीयांकरिता पिण्याचे शुद्ध व चांगले पाणी नळ जोडण्यांच्या माध्यमातून देण्याची योजना आखली आणि उमटे धरणाची वर्गणी भरून अखेर अलिबाग शहरात उमटे धरणाचे पाणी नळ जोडण्यांद्वारे नागरिकांना उपलब्ध झाले.
त्रिवेणी योग जुळला
आज देशभरात ‘स्वच्छ भारत, समृद्ध भारत’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्तरावरून राबविण्यात येत आहे. मानवी आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आह़े त्याकरिता प्रत्येकाच्या घरात सेफ् िटक शौचालय असलेच पाहिजे, हा आग्रह सरकारचा आहे. त्या काळात अलिबागेत टोपलीची शौचालये असत. नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी मानवी मैला बैलगाडीवरील टँकर्समधून शहराबाहेर टाकत. ही अमानवी पद्धत भाऊंनी आपल्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत बंद करून सेफिटक टँकसह सेफिटक शौचालयांची योजना यशस्वी केली.
़़़़तरीही भाऊ आमदार झाले
आजचे सारे राजकारण जातीवर असताना भाऊंनी ते केले नाही. तेली समाजाची केवळ 17 मते अलिबाग विधानसभा मतदारसंघात असताना भाऊ 1962 मध्ये आगरी, कोळी व माळी समाजाची तब्बल 18 हजार 5क्क् मते घेऊन शेकापचे स्व. अॅड. दत्ता पाटील यांना पराभूत करून प्रथम आमदार झाले.
भाऊंचे गाजलेले भाषण
यशवंतराव चव्हाण दिल्लीत गेल्यावर मारोतराव कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या वेळी सभागृहात यशवंतराव मोहिते, मधुसूदन वैराळे या नावलौकिक सदस्यांनी बोलावे व अखेरीस मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी उत्तर द्यावे, अशी व्यूहरचना ठरली होती. विरोधी पक्षात कृष्णराव धुळप, डी. बी. पाटील, पाटकर हे दिग्गज नेते होते. या चर्चेच्या वेळी कृष्णराव धुळप व पाटकर यांनी मजूरविषयक धोरणावर हल्ला चढवला. आयत्या वेळेस चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्री कन्नमवार यांनी भाऊंना बोलायला सांगितले. कोणतीही तयारी नसताना भाऊंनी त्या हल्ल्याचा समाचार घेतला.