शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खंडोबा, बिरोबा माझे मायबाप; तुम्ही खुशाल ५० कोटींचा दावा करा, पडळकरांनी वडेट्टीवारांना पुन्हा डिवचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 16:48 IST

Gopichand Padalkar & Vijay Vadettiwar News: गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या घणाघाती आरोपांमुळे संतापलेल्या विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र आता गोपिचंड पडळकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

मुंबई  - भाजपा नेते आमदार गोपिचंद पडळकर आणि राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. दरम्यान, गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या घणाघाती आरोपांमुळे संतापलेल्या विजय वडेट्टीवार यांनी पडळकर यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचा दावा ठोकण्याचा इशारा दिला होता. मात्र आता गोपिचंड पडळकर यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले असून, खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा आहेत, अशा शब्दात त्यांनी वडेट्टीवार यांना प्रतिआव्हान दिले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी दिलेल्या ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या इशाऱ्यावर प्रतिक्रिया देताना पडळकर म्हणाले की, राज्यातील ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींच्या हक्काचे १२५ कोटी रुपये यांना खर्च करता आलेले नाहीत. आता हे माझ्यावर ५० कोटींच्या मानहानीचा दावा करणार आहेत. त्यांनी तो खुशाल करावा. मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. कारण माझी माय आणि बाप श्री मल्हारी मार्तंड खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबा आहे, असे आव्हान पडळकर यांनी दिले.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांची छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री आहे. तसेच मद्याच्या व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे, असा आरोप गोपिचंद पडळकर यांनी केला होता. त्यामुळे विजय वडेट्टीवार संतप्त झाले होते. त्यांनी  पडळकर यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच पडळकरांनी ऐकीव गोष्टींवरून आरोप करू नयेत तर वस्तुस्थितीला धरून आरोप करावेत, असा सल्ला वडेट्टीवार यांनी दिला होता. माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र ही फॅक्ट्री कुठे आहे, हे त्यांनी शोधून काढावे, नाही सांगितलं तर मी कोर्टात जाईन, अब्रुनुकसानीचा दावा दाखल करेन, असा इशाराही त्यांनी पडळकर यांना दिला.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारPoliticsराजकारण