राष्ट्रवादीत खांदेपालट; जाधवऐवजी तटकरे!
By Admin | Updated: June 24, 2014 00:59 IST2014-06-24T00:59:37+5:302014-06-24T00:59:37+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड होईल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादीत खांदेपालट; जाधवऐवजी तटकरे!
>मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांची निवड होईल, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. 25 जूनला पक्षाच्या प्रदेश विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत या निवडीवर शिक्कामोर्तब केले जाईल, असे सूत्रंनी सांगितले.
प्रदेशाध्यक्षपदी तटकरे यांची निवड झाली, तर जलसंपदा खात्याचा कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविला जाईल, की इतर कोणाकडे याबाबत उत्सुकता आहे. (विशेष प्रतिनिधी)