शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
2
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
3
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
4
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
5
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
6
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
7
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
8
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
9
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
10
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
11
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
12
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
13
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
14
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
15
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
16
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
17
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
18
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
19
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
20
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

यशवंत पंचायत राज अभियान स्पर्धा: सांगली जिल्ह्यातील 'ही' पंचायत समिती पुणे विभागात प्रथम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:13 IST

विटा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानात स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम ...

विटा : महाराष्ट्र शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या यशवंत पंचायत राज अभियानात स्पर्धेत सांगली जिल्ह्यातील खानापूर-विटा पंचायत समितीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकावला. खानापूर पंचायत समितीचा या स्पर्धेत विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक आल्याने ११ लाख रूपयांचे रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र १२ मार्चला मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात मिळणार आहे. तर, शिराळा पंचायत समितीला दुसरा आणि सातारा जिल्ह्यातील खंडाळा पंचायत समितीला तिसरा क्रमांक मिळाला आहे.राज्य सरकारने सन २०२४-२५ या वर्षात यशवंतराव चव्हाण पंचायत समिती अभियान राबविले. राज्यातील उत्कृष्ट जिल्हा परिषदा व पंचायत समिती पुरस्काराबाबत विभाग स्तरावरील पारितोषिक निवड समितीची पुणे येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दि.२४ रोजी बैठक झाली. यात विभागीय स्तरावरील गुणाकंनानुसार यशवंत पंचायत राज अभियानामध्ये खानापूर पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाल्याचे विभागीय उपायुक्त विजय मुळीक यांनी जाहीर केले असल्याची माहिती खानापूरचे गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील यांनी दिली. गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने राज्यात यशवंत पंचायत राज अभियान राबविले जाते. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व कामकाजाचे मूल्यमापन होते. सन २०२३-२४ मध्ये खानापूर पंचायत समितीने या अभियानात सहभाग घेतला होता. गेल्या आठवड्यात पुणे विभागीय स्तरावरील कमिटी खानापूर पंचायत समितीच्या तपासणीसाठी आली होती. विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अत्यंत चांगल्याप्रकारे कमिटीला माहिती दिली. यावेळी कमिटीने कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात निकाल जाहीर केला. त्यात पंचायत समितीला पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळाला आहे. आमदार सुहास बाबर यांचे ही यासाठी चांगले मार्गदर्शन मिळाले. खानापूर पंचायत समिती पुणे विभागात पहिली आल्याबद्दल आमदार सुहास बाबर, जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर, माजी सभापती महावीर शिंदे यांच्यासह अनेकांनी पंचायत समितीतील अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

टॅग्स :Sangliसांगलीpanchayat samitiपंचायत समिती