खामगाव - पोस्ट आॅफीसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!
By Admin | Updated: November 17, 2016 20:22 IST2016-11-17T20:22:10+5:302016-11-17T20:22:10+5:30
ऑनलाइन लोकमत खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 17 : एक हजार आणि पाचशेच्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट ...

खामगाव - पोस्ट आॅफीसमध्ये दीड कोटींच्यावर ठेव जमा!
ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 17 : एक हजार आणि पाचशेच्या चलनी नोटांवर बंदी घालण्यात आल्यानंतर शहरासह राज्यातील पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्याचा ओघ कमालिचा वाढला आहे. दरम्यान, पती राजांपासून लपविलेल्या लक्षावधी रुपयांचाही बचत आणि आवर्ती ठेव म्हणून जमा करण्याचा प्रयत्न महिला वर्गाकडून गेल्या जात आहे. त्यामुळे गेल्या आठ दिवसांमध्ये खामगाव पोस्ट आॅफीसमध्ये तब्बल एक कोटी ६६ लक्ष ८० हजार ९०८ रुपयांची ठेव जमा झाली आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार ०९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला.
या नोटा ३० डिसेंबरपर्यंत पोस्टात किंवा बँकेत जमा कराव्या लागणार आहे. त्यामुळे मंगळवारी हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लगेच शहरातील एटीएमवर पैसे काढण्यासाठी, काहींनी भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. दरम्यान, गुरूवार १० नोव्हेंबरपासून नागरिकांचा राज्यातील विविध पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून जमा करण्यासाठी ओघ सुरू झाला.
खामगाव येथील पोस्ट आॅफीसमध्ये बुधवार म्हणजेच १६ नोव्हेंबरच्या सायंकाळ पर्यंत तब्बल एक कोटी ६६ लक्ष ८० हजार ९०८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे. यामध्ये ठेव जमा करणाऱ्यांमध्ये महिला वर्गाचा प्रामुख्याने कल दिसून येत आहे. त्यामुळे पती राजांपासून लपविलेली लक्षावधी रुपयांची रक्कम पोस्ट आॅफीसमध्ये ठेव म्हणून ठेवल्या जात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हजार आणि पाचशेच्या चलनी नोटा चलनातून बाद झाल्यानंतर, पोस्ट आॅफीसमध्ये रक्कम ठेव म्हणून गुंतविण्यासाठी नागरिकांचा कल वाढला आहे. यामध्ये महिला वर्गाची विशेष गर्दी असून, बुधवारपर्यंत १ कोटी ६६ लक्ष ८०९०८ रुपयांची बचत आणि आवर्ती ठेव जमा झाली आहे.
- व्ही.एस.हिवराळे
पोस्ट मास्तर, पोस्ट आॅफीस खामगाव.
https://www.dailymotion.com/video/x844ihr