खालापूरमध्ये ३६,४०२ वृक्षांची लागवड

By Admin | Updated: July 2, 2016 03:20 IST2016-07-02T03:20:49+5:302016-07-02T03:20:49+5:30

खालापूर तालुक्यात सर्वच भागांमध्ये शुक्रवारी सकाळपासून वृक्षलागवड मोहिमेला जोरदार सुरू होती

In Khalapur, 36,402 trees are planted | खालापूरमध्ये ३६,४०२ वृक्षांची लागवड

खालापूरमध्ये ३६,४०२ वृक्षांची लागवड

 

खालापूर : खालापूर तालुक्यात सर्वच भागांमध्ये शुक्रवारी सकाळपासून वृक्षलागवड मोहिमेला जोरदार सुरू होती. यावेळी वन विभाग, महसूलसह अन्य विभागांसह ओद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण तालुक्यात ३६,४0२ वृक्षांची लागवड करण्यात आली. पहिल्याच दिवशी हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली खालापूर वन विभागाने तूपगाव , जांभिवली, गोहे, वरोसे, शेमडी, धामणी या ठिकाणी १० हजार वृक्षलागवड केली. यावेळी श्री सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. ओद्योगिक क्षेत्रातील रिलायन्स कंपनीने लोधीवली ग्रामपंचायत हद्दीतील जागेत रिलायन्स कंपनीचे प्रेसिडन्ट आशू गर्ग, हेमंत बाळ, उपसभापती श्याम साळवी, जि. प. सदस्य मोतीराम ठोंबरे, सुधीर ठोंबरे, रिलायन्सचे संतोष विचारे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी रिलायन्स टाऊनशिपमध्ये शेकडो वृक्ष लावण्यात आले. पर्यावरण समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड गरजेची असल्याचे प्रेसिडन्ट आशू गर्ग यांनी नमूद केले, तर ग्रामसेविका रश्मी शिंदे यांनी वृक्ष जोपासण्याची हमी यावेळी दिली.
नगरपालिका क्षेत्रातील विविध २२ ठिकाणी चार हजार वृक्षलागवड करण्यात आली. टेकडी आणि उद्यानासह मोकळ्या जागेत ही लागवड करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दत्तात्रय मसुरकर, मुख्याधिकारी दीपक सावंत, विरोधी पक्षनेते तुकाराम साबळे आदींसह नगरसेवक, अधिकारीवर्गासह शहरातील श्री सदस्य, अनिरु द्ध बापू यांचे भक्त यांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: In Khalapur, 36,402 trees are planted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.