शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्याची राष्ट्रवादीची खेळी- प्रवीण दरेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 20:23 IST

Goverment, Politics, pravindarekar, bjp, sataranews  राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्ष राज्याचा कारभार चालवला. याचा पोटशूळ काहींना आहे. त्यामुळे खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देवकीलाला लाखो रुपये देता तर शेतकऱ्यांना का नाही? :प्रवीण दरेकर अर्णब गोस्वामी प्रकरणात जितकी तत्परता दाखवली; तीच राज्य शासनाने दाखवावी

सातारा : राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी अत्यंत कुशलपणे पाच वर्ष राज्याचा कारभार चालवला. याचा पोटशूळ काहींना आहे. त्यामुळे देवेंद्र्र फडणवीस यांना कोंडीत पकडून त्यांची छबी बदनाम करण्यासाठी एकनाथ खडसे यांचा वापर करण्यात आलेला आहे. खडसेंचा गेम करून फडणवीसांवर निशाणा साधण्यासाठी राष्ट्रवादीने खडसेंना पक्षात घेतले आहे. गेलेल्या ठिकाणी राहून त्यांनी समाजोपयोगी कार्य करावे. आम्ही त्यांना ह्यनांदा सौख्यभरेह्ण असेच म्हणतो, असे टीकास्त्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सोडले.दरेकर गुरुवारी सातारा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आले असताना शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य शासनावर त्यांनी टीका केली. ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी हवालदिल झाले आहेत, अशा वेळी राज्य शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक मदत करणे जरुरीचे आहे. मात्र राज्य शासनाने सुशांत सिंह प्रकरणात वकील नेमण्यासाठी १५ लाखांची तरतूद केली शेतकऱ्यांना मदत करताना तत्परता दाखवली जात नाही उलट केंद्राकडे बोट दाखवले जाते. हे अत्यंत चुकीचे आहेमहाराष्ट्रात एखाद्या घटनेमध्ये सीबीआय चौकशी लागण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले, देशाचा व सर्व घटक राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालतो. कुठल्याही प्रकरणात राज्य आणि केंद्र संघर्ष उभा करणं हे लोकशाहीला मारक ठरेल तसेच आपल्या व्यवस्थेला देखील हे परवडणारे नाही. त्यामुळे अशांतता पसरेल कायद्याने जो मार्ग दाखवला आहे तो सगळ्यांना अंगिकारणे आवश्यक आहे.वकीलाला लाखो रुपये देता तर शेतकऱ्यांना का नाही?अर्णब गोस्वामी प्रकरणात वकील नेमण्यासाठी राज्यशासनाने वकीलाला पंधरा लाख रुपये दिले इतकी तत्परता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी का दाखवली जात नाही? असा प्रश्नही दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपस्थित केला.

टॅग्स :BJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरSatara areaसातारा परिसर