खडसेंचे ओएसडीही रडारवर
By Admin | Updated: May 19, 2016 06:22 IST2016-05-19T06:22:01+5:302016-05-19T06:22:01+5:30
विशेष कार्यअधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे.

खडसेंचे ओएसडीही रडारवर
डिप्पी वांकाणी,
मुंबई- ३० कोटी रुपयांच्या लाचप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे विशेष कार्यअधिकारी (ओएसडी) उन्मेश महाजन यांना आठवडाभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) चौकशीसाठी पाचारण करण्याची शक्यता आहे.
एका सामाजिक संस्थेला भूखंड मिळवून देण्यासाठी ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मंत्री खडसे यांचा निकटवर्तीय गजानन पाटील यास एसीबीने सापळा रचून पकडले असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. याप्रकरणाचे धागेदोरे उकलण्यास एसीबीने सुरुवात केली असून महसूल विभागातील काही अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात येण्याची चिन्हे आहेत.
चर्चगेटमधील मॅजेस्टिक आमदार निवासातील ११३ क्रमांकाच्या खोलीत गजानन पाटीलचा मुक्काम होता. त्याला ती रूम कोणी मिळवून दिली तसेच तो तेथे लाचेचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी होता का, याची आम्ही चौकशी करीत आहोत, असे एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. यात ओसडी उन्मेष महाजन यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी एसीबी करीत असून अधिक चौकशीसाठी त्यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. एसीबीने गेल्या सप्टेंबरपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात पाटीलविरुद्ध पुरेसे पुरावे जमा केल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार तक्रारकर्ते आणि पाटील यांच्यातील १२ बैठकांतील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले. यातील बहुतांश रेकॉर्डिंग हे मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील महसूल विभागाच्या कार्यालयात किंवा त्या परिसरात आणि नरिमन पॉइंट येथील खडसेंच्या बंगल्याबाहेर ६-सी, येथे करण्यात आले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
>दोघांमधील संभाषण केले रेकोर्ड
या प्रकरणात ओसडी उन्मेष महाजन यांचा सहभाग आहे का, याची पडताळणी एसीबी करीत असून अधिक चौकशीसाठी त्यांना पाचारण केले जाण्याची शक्यता आहे. एसीबीने गेल्या सप्टेंबरपासून या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. यासंदर्भात पाटीलविरुद्ध पुरेसे पुरावे जमा केल्यानंतर गेल्या आठवड्यात सापळा लावण्यात आला होता. त्यानुसार तक्रारकर्ते आणि पाटील यांच्यातील १२ बैठकांतील संभाषण रेकॉर्ड करण्यात आले.