खडसेंच्या अभिनंदन ठरावावरून खडाजंगी

By Admin | Updated: June 14, 2016 18:35 IST2016-06-14T18:35:13+5:302016-06-14T18:35:13+5:30

माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्याचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली.

Khadajen congratulations | खडसेंच्या अभिनंदन ठरावावरून खडाजंगी

खडसेंच्या अभिनंदन ठरावावरून खडाजंगी

ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १४ : माजी कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांचे कपाशी व इतर बियाण्याचे दर निम्मे कमी केल्यावरून त्यांचे अभिनंदन करण्याच्या ठरावाच्या मुद्द्यावरून मंगळवारी जि.प.च्या सर्वसाधारण सभेत चांगलीच खडाजंगी झाली. बियाण्याचे दर निम्मे कमीच झालेले नसल्याचे सांगत विरोधकांनी या ठरावात सुधारणा करण्याची मागणी केली. तर सत्ताधाऱ्यांनी हा विषय बहुमताच्या बळावर पुढे रेटला.
सभेच्या अध्यक्षस्थानी प्रयाग कोळी होत्या. उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, सभापती सुरेश धनके, मीना पाटील, नीता चव्हाण, दर्शना घोडेस्वार, सीईओ आस्तिककुमार पांडेय, अतिरिक्त सीईओ संजय मस्कर, राजन पाटील आदी व्यासपीठावर होते.

Web Title: Khadajen congratulations