रॉकेलचा ट्रक ५0 हजारांत सोडला!
By Admin | Updated: September 27, 2016 02:59 IST2016-09-27T02:59:06+5:302016-09-27T02:59:06+5:30
आकोट शहर पोलिसांचा प्रताप; रॉकेल माफियाचे ‘रेकॉर्डिंग’ लोकमतच्या हाती.

रॉकेलचा ट्रक ५0 हजारांत सोडला!
सचिन राऊत
अकोला, दि. २६- इंधन टाकीमध्ये डिझेलऐवजी रॉकेल असलेला एक ट्रक आकोट पोलिसांनी ५0 हजार रुपये घेऊन सोडल्याचे खळबळजनक प्रकरण एका ह्यकॉल रेकॉर्डिंगह्णमुळे उघडकीस आले आहे. सदर 'रेकॉर्डिंग' लोकमतच्या हाती लागले असून, ते जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
ट्रक सोडण्यासाठी पोलिसांना ५0 हजार रुपये दिल्याची माहिती आकोट येथील एका रॉकेल माफियाने एका व्यक्तीला फोनद्वारे दिली. त्या संभाषणाचे 'रेकॉर्डिंग'मध्ये काही पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथक व बिट जमादारास हप्ता देत असल्याचे, स्पष्ट होत आहे.
आकोट शहरातील जीवन टायर्स नामक दुकानासमोर एम एच ४0 एके ४७५0 क्रमांकाचा ट्रकचे टायर बदलण्याचे काम सुरू होते. नेमके त्याचवेळी आकोट शहर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचार्यांनी त्या ट्रकची झडती घेऊन, डिझेल टॅँकमध्ये रॉकेल असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणला. दुपारच्या सुमारास ट्रक पोलीस स्टेशनमध्ये लावल्यानंतर दिवसभर हा ट्रक ठाण्यातच उभा ठेवून कोणतीही कारवाई न करता ५0 हजार रुपये घेऊन सोडून दिला.
या ट्रकमध्ये टाकण्यासाठी आकोटातील बड्या रॉकेल माफियाकडून रॉकेल घेण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी सदर रॉकेल माफियाला ट्रक पकडल्यासंदर्भात विचारणा केली असता, या रॉकेल माफियाने हप्ते दिल्यावरही पोलिसांनी ट्रक पकडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सदर माफीयाने एका व्यक्तीला फोनवर या कारवाईबाबत माहिती देताना, पोलीसांनी सदर ट्रक हा तुमचा किंवा तुमच्या मुलाचा नसल्याचे सांगून, बाहेरील असल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले; मात्र सदर ट्रक सोडण्यासाठी सदर रॉकेल माफियालाच ५0 हजार रुपये द्यावे लागल्याने त्याने पोलिसांच्या या डबल हप्तेखोरीवर प्रचंड संताप व्यक्त केला. हे ह्यऑडिओ रेकॉर्डीगह्ण पोलीसांच्या हप्तेखोरीवर शिक्कामोर्तब करीत आहे.
लोकप्रतिनिधी असलेल्या या रॉकेल माफियाने आकोट येथील काही पोलिस अधिकारी गुन्हे शोध पथक आणि बिट जमादार या सर्वांनाच दर महिन्याला 'पेमेंट' देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला असून, आकोट शहर पोलिसांनी सदर ट्रक पोलीस स्टेशनमध्ये उभा केल्याचे छायाचित्र आणि रॉकेल माफियाने पोलिसांसह अधिकार्यांवर हप्तेखोरीचा आरोप केल्याचे 'रेकॉर्डिंग' लोकमतच्या हाती लागले आहे.