संमेलनात मराठी साहित्याचे अनुवाद विक्रीस ठेवा

By admin | Published: September 20, 2014 02:25 AM2014-09-20T02:25:15+5:302014-09-20T02:25:15+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला होणार असल्याने रूसलेल्या प्रकाशकांची समजूत काढण्याचा प्रयत्न संयोजकांनी केला.

Keep a translation of Marathi literature in the seminar | संमेलनात मराठी साहित्याचे अनुवाद विक्रीस ठेवा

संमेलनात मराठी साहित्याचे अनुवाद विक्रीस ठेवा

Next
पुणो : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमानला होणार असल्याने रूसलेल्या प्रकाशकांची समजूत काढण्याचा प्रयत्न संयोजकांनी केला. त्यावर पर्यायी प्रदर्शन संमेलनापूर्वी भरविण्याचा विचार झाला. परंतु तिसरा पर्याय म्हणून मराठीतील उत्तम साहित्याच्या हिंदी अनुवादाची पुस्तके विक्रीस ठेवली तर तेथे नक्कीच मोठा प्रतिसाद मिळेल, असा तोडगा संमेलनाध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक कामत यांनी सूचविला आहे.
कामत यांनी 88 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी पुण्यातून अर्ज भरला असून हे जाहीर करताना ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 5क् वर्षे संत नामदेव, हिंदी व पंजाबी भक्ती परंपरा यांचा अभ्यास आपण केला आहे. पंजाब व महाराष्ट्र आणि पर्यायाने सर्व बृहन्महाराष्ट्र जोडण्यासाठी या ज्ञानाचा काही उपयोग करता यावा म्हणून हे व्यासपीठ अत्यंत योग्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. 
ते म्हणाले, साहित्यिक प्रत्यक्ष सामाजिक कामात उतरले तर बरेच प्रश्न सुटणो सोपे होतील. तसेच साहित्यही समृद्ध होऊ शकते.

 

Web Title: Keep a translation of Marathi literature in the seminar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.