शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयावर लक्ष ठेवून कष्टाची तयारी ठेवा - ललिता बाबर-भोसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 01:30 IST

कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.

काटेवाडी - ध्येयावर लक्ष ठेवून कष्टांची तयारी ठेवा. क्षेत्र कोणतेही असो मेहनती शिवाय फळ नाही. कोणतेही गोष्ट आत्मसात करण्यासाठी शिस्त महत्त्वाची आहे. कठोर परिश्रम व शिस्तीचे पालन केल्यास यशापासून कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन रिओ आॅलिंपिक खेळाडू ललिता बाबर- भोसले यांनी केले.काटेवाडी (ता. बारामती ) येथे शरयू फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातून अनेक क्षेत्रात मुले पुढे येतात. यशस्वी होतात. मी सुध्दा खेडेगावातून आली आहे. मला शिक्षणाची आवड नव्हती. मात्र, मी खेळावर लक्ष केंद्रित केले. गावाकडेच धावण्याचा सराव केला. दररोज घर ते शाळा धावत सराव केला. आई-वडिलांसह काकांनी पाठिंबा दिल्यानेच आॅलिंपिक पर्यंतचे ध्येय गाठता आले. दोन वर्ष कठोर परिश्रम घ्यावे लागले. कुटुंबापासून दूर, रहावे लागले. आवडते पदार्थ खाण्यावर बंधन घातले. टीव्ही पाहता आला नाही. तरीही धेयापासून लक्ष विचलित झाले नाही. धेय गाठण्याची मनात जिद्द होती. अडचणीवर मात करत यश मिळवले.तत्पुर्वी बाबर यांचे वाद्यांचा गजरात पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी वक्तृत्व स्पर्धातील यशस्वी विद्यार्थिनींना त्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देवून गौरवण्यात आले. यावेळी राजवर्धन शिंदे, माळेगावचे संचालक दिपक तावरे, जिल्हा परिषद सदस्य अभिजीत ताबिले, संजय काटे, राजेंद्र निंबाळकर, अनिल काटे, महादेव कचरे, अविनाश भिसे, बापू गायकवाड, आबा टकले, अश्विनी खर्चे, मुख्याध्यापक अनिल खैरे, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान, वक्तृत्व स्पर्धेत मोठ्या गटात प्रथम क्रमांक सानिका ब्रह्मदेव कोकरे, द्वितीय क्रमांक शर्वरी प्रवीण शेटे, तृतीय क्रमांक अनिकेत अविनाश नरुटे यांनी पटकविला. समृद्धी नंदकिशोर चव्हाण व ऋतुराज तुषार राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. मध्यम गटात प्रथम क्रमांक श्रेणीका संतोष जांबले द्वितीय क्रमांक नंदीनी जयवंत निंबाळकर तृतीय क्रमांक श्रावणी सचिन उगले उत्तेजनार्थ पारितोषिके सिद्धी अनिल पांढरे व अथर्व सुबोध अवचट यांनी पटकावली.मला घडवण्याचे श्रेय आजोबांना जाते. मुलगी असूनही मला त्यांनी खेळासाठी स्वातंत्र्य दिले. माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे खेळाची एकनिष्ठ मैत्री झाली. खेळ हा सर्वत्र उंचावलेला आहे. जगात नाव कमावण्याची संधी मिळते, या साठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळ कोणताही असो, यासाठी मेहनत व कष्टांतून आवडत्या खेळाची एकनिष्ठ मैत्री करावी विनाकारण आईवडिलासह कुटूंबाचा अपेक्षा भंग होऊ देवू नका.- ललिता बाबर- भोसले,रिओ आॅलिंपिक खेळाडू

टॅग्स :Sportsक्रीडाStudentविद्यार्थी