केडीएमटीत बसथांब्यांचा चार कोटींचा घोटाळा उघड

By Admin | Updated: July 20, 2016 04:14 IST2016-07-20T04:14:13+5:302016-07-20T04:14:13+5:30

विविध घोटाळ््यांमुळे केडीएमटीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता त्यात बसथांब्यांच्या घोटाळ््याची भर पडली आहे.

KDMT has a scam of Rs four crore in Bastherbhai | केडीएमटीत बसथांब्यांचा चार कोटींचा घोटाळा उघड

केडीएमटीत बसथांब्यांचा चार कोटींचा घोटाळा उघड


कल्याण : तिकीट, डिझेल-फिल्टर, इंजिन अशा विविध घोटाळ््यांमुळे केडीएमटीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असतानाच आता त्यात बसथांब्यांच्या घोटाळ््याची भर पडली आहे. केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी हा घोटाळा उघडकीस आणला आहे. बसथांबे उभारण्यासंदर्भात काढलेल्या निविदेतील अटी-शर्थींचा करारनाम्यात बदल केल्याचे समोर आले आहे. चार कोटींचा हा घोटाळा असल्याचा आरोप चौधरी यांनी केला आहे. केडीएमटीचे नुकसान करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून त्यांच्याकडून आर्थिक नुकसान वसूल करावेत, असे पत्र चौधरी यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांना दिले आहे.
केडीएमटीने २०१४ मध्ये अस्तित्वात असलेल्या १२४ बसथांब्यांच्या पुर्नबांधणीसाठी निविदा जाहीर केली होती. यात प्रस्तावित नव्या ११९ बसथांब्यासह थांब्यांचे फलक लावण्यासंदर्भात ५०० खांब उभारण्याचेही नमूद केले होते. निविदा जाहीर करताना स्टेनलेस स्टिलचे बसथांबे असावेत तसेच फ्लोरिंग करणे, मध्यभागी केडीएमटीचा लोगो वापरणे, थांब्याच्या ठिकाणी मार्गावर जाणाऱ्या बसचे वेळापत्रक जाहीर करावे आणि थांब्याचे नाव असावे, अशा अटी-शर्थी होत्या. त्यासाठी सन एन स्टार अ‍ॅडव्हरटायझर्स प्रा. लिमिटेड कंपनीने दाखल केलेली निविदा मंजूर केली. दरम्यान निविदा मंजुरीनंतर केलेल्या करारनाम्यात ‘स्टेनलेस स्टिल’ हा शब्द गहाळ करण्यात आल्याकडे चौधरी यांनी लक्ष वेधले.
१२४ ऐवजी ३५ ते ४० बस थांब्यांचीच आतापर्यंत पुर्नबांधणी झाली आहे. यात स्टिलऐवजी लोखंड वापरले. मात्र, तेही सुमार दर्जाचे आहे. भंगार सामानाचा उपयोग करून त्याला रंगरंगोटी केल्याचा चौधरींचा आरोप आहे. (प्रतिनिधी)
>दौऱ्यात वास्तव झाले उघड; केडीएमटीची कंत्राटदाराकडून फसवणूक
‘लोकमत’ने ‘आॅन द स्पॉट’द्वारे केडीएमटीची दुरवस्था उघड केली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी अन्य सदस्यांसह उपक्रमातील कल्याण-रिंगरुट मार्गावरील प्रवासी निवारे बसथांब्यांची पाहणी केली होती. यात त्यांनी शिवाजी चौक, लालचौकी, दुर्गाडी, आधारवाडी, गायकरपाडा, गोल्डन पार्क, खडकपाडा, चिकणघर, भोईरवाडी, इंदिरानगर येथील बसथांब्यांना भेटी दिल्या.
यात केडीएमटीचा लोगो नसणे, वेळापत्रक फलक न लावणे, थांब्यांची आसन व्यवस्था अत्यंत खराब असणे, तुटलेल्या अवस्थेतील छत आणि पत्रे, फ्लोरिंग नसणे, थांब्यांवरील मोठ्या प्रमाणातील जाहिरातींमुळे संबंधित उत्पन्न बुडणे आदी त्रुटी आढळून आल्या. यानंतर कंत्राटदारासमवेत झालेला करारनामा तपासला असता केडीएमटी उपक्रमाची झालेली फसवणूक समोर आल्याचे चौधरी यांनी सांगितले.

Web Title: KDMT has a scam of Rs four crore in Bastherbhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.