ध्वनिचित्रफितीमुळे केडीएमसी चर्चेत

By Admin | Updated: July 2, 2016 03:44 IST2016-07-02T03:44:32+5:302016-07-02T03:44:32+5:30

केडीएमसीचे दोन अधिकारी पैसे घेत असल्याच्या ध्वनिचित्रफितीने महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे.

KDMC talk due to the video footage | ध्वनिचित्रफितीमुळे केडीएमसी चर्चेत

ध्वनिचित्रफितीमुळे केडीएमसी चर्चेत


कल्याण : केडीएमसीचे दोन अधिकारी पैसे घेत असल्याच्या ध्वनिचित्रफितीने महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. महापालिकेतील एका कर्मचाऱ्यानेच ही चित्रफीत तयार केली आहे.
याबाबत, त्याने ती पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांना पाठवली आहे. या भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी त्याने केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्त ई. रवींद्रन यांनी समिती नेमली असून ४८ तासांत अहवाल देण्याचे आदेश गुरुवारी दिले.
या चित्रफितीतील एका भागात माजी शहर अभियंता पी.के. उगले हे एकाकडून पैसे स्वीकारताना आणि फाइल तपासताना दिसत आहेत, तर दुसऱ्या भागात कार्यकारी अभियंता दीपक भोसले हे त्यांच्या घरी एकाकडून पैसे आणि फाइल घेताना दिसत आहेत.
ही चित्रफीत कधीची आणि कशासंदर्भात आहे, असे सवाल उपस्थित झाले असल्याचे स्पष्टीकरण मिळालेले नाही.याबाबत, आयुक्त रवींद्रन यांच्याकडे विचारणा केली असता संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संबंधित तक्रारदार महापालिकेचा कर्मचारी आहे की नाही, याचीही तपासणी होणार आहे. उगले हे आधीपासूनच रजेवर आहेत, तर भोसले यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचे त्यांनी सांगितले. चौकशीतून जे समोर येईल, त्यानुसार ही कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: KDMC talk due to the video footage