कवठेएकंदच्या दसरा आतषबाजीवर बंदी ?
By Admin | Updated: May 7, 2015 03:18 IST2015-05-07T03:18:11+5:302015-05-07T03:18:11+5:30
तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे झालेल्या स्फोटात ११ जणांचे बळी गेल्याने येथील दसऱ्याच्या पारंपरिक आतषबाजीवर बंदी घालण्याचा प्रशासनाचा विचार आहे.

कवठेएकंदच्या दसरा आतषबाजीवर बंदी ?
मिरज : तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे झालेल्या स्फोटात ११ जणांचे बळी गेल्याने येथील दसऱ्याच्या पारंपरिक आतषबाजीवर बंदी घालण्याचा प्रशासनाचा विचार आहे. कवठेएकंद येथील स्फोटाची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आल्याचे प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी बुधवारी सांगितले.
सोमवारच्या स्फोटात ११ बळी गेल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
२०१३ साली दसऱ्यानिमित्त झालेल्या आतषबाजीत स्फोट झाल्यानंतर प्रशासनाने आतषबाजीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला होता. सुरक्षा उपाययोजनांत कसूर केल्याबद्दल दोघांचे परवाने रद्द करण्यात आले. मात्र, शोभेच्या दारूच्या आतषबाजीच्या परंपरेवर निर्बंध घालण्यात आले नव्हते.