कविता करकरे यांची प्रकृती चिंताजनक
By Admin | Updated: September 29, 2014 07:34 IST2014-09-29T07:34:29+5:302014-09-29T07:34:29+5:30
एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.

कविता करकरे यांची प्रकृती चिंताजनक
मुंबई : एटीएस प्रमुख शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
कविता करकरे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा त्या पूर्णत: बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांच्या हृदयाचे कार्य नियमित व्हावे म्हणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
मात्र त्या उपचारांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देत नव्हत्या. त्यांच्या काही तपासण्या केल्यानंतर त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले आहे. त्यांच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)