कविता करकरे यांचे निधन
By Admin | Updated: September 29, 2014 16:27 IST2014-09-29T16:27:04+5:302014-09-29T16:27:05+5:30
मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे सोमवारी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झाले.

कविता करकरे यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचे सोमवारी मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात निधन झाले. कविता करकरे यांच्या निधनानंतर त्यांचे अवयवदान करण्यात येणार आहे.
घरात पडल्याने कविता करकरे यांना शनिवारी सकाळी हिंदूजा रुग्णालयात दाखल होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मेंदूचा रक्तपुरवठा खंडित झाला होता. गेले दोन दिवस त्यांच्या उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीरच होती. सोमवारी सकाळी कविता करकरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. आईचे अवयव दान करणार असल्याती माहिती करकरे यांच्या मुलांनी दिली आहे.