मसापच्या अध्यक्षपदी पुन्हा कौतिकराव ठाले

By Admin | Updated: September 1, 2015 01:19 IST2015-09-01T01:19:31+5:302015-09-01T01:19:31+5:30

मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची कार्यकारिणी सोमवारी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी कौतिकराव ठाले

Kaushikrao Thule again became President of Mashap | मसापच्या अध्यक्षपदी पुन्हा कौतिकराव ठाले

मसापच्या अध्यक्षपदी पुन्हा कौतिकराव ठाले

औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या (मसाप) नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाची कार्यकारिणी सोमवारी जाहीर झाली असून, अध्यक्षपदी कौतिकराव ठाले पाटील, तर उपाध्यक्षपदी डॉ. किरण सगर यांची निवड करण्यात आली आहे. मसापच्या इतर समित्यांची घोषणाही करण्यात आली. मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकरअण्णा मुळे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. अखिल भारतीय साहित्य महामंडळावर ठाले पाटील, दादा गोरे व आसाराम लोमटे यांची प्रतिनिधी म्हणून निवड झाली. मराठवाड्यातील लेखकांच्या दर्जेदार साहित्यकृती इंग्रजी व हिंदीत भाषांतरित केल्या जातील, असे ठाले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Kaushikrao Thule again became President of Mashap