कात्रज - देहूरोड बायपासवर बसची दुचाकीला धडक, चौघांचा मृत्यू
By Admin | Updated: November 15, 2015 13:22 IST2015-11-15T13:22:19+5:302015-11-15T13:22:19+5:30
पुण्यातील कात्रज देहूरोड बायपासवर भरधाव वेगात असलेल्या बसने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणा-या दोन दुचाकींना उडवल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.

कात्रज - देहूरोड बायपासवर बसची दुचाकीला धडक, चौघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १५ - पुण्यातील कात्रज देहूरोड बायपासवर भरधाव वेगात असलेल्या बसने दुभाजक तोडून विरुद्ध दिशेने येणा-या दोन दुचाकींना उडवल्याची घटना रविवारी घडली. या अपघातात चौघा जणांचा मृत्यू झाला आहे.
कात्रज देहूरोडवर फन कीजवळ कोल्हापूरहून मुंबईकडे जाणा-या खासगी बसचे नियंत्रण सुटले व बसने दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणा-या दोन दुचाकींना जाऊन धडकली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा जखमीचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. कात्रज देहूरोड बायपासचे काम गेल्या काही महिन्यांपासून अर्धवट अस्थेत असून यामुळे बायपासवर वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे.