शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

दोन पोटनिवडणुका दोन पॅटर्न, कुठला वाढवणार कुणाचं टेन्शन? असं दिसतंय पुढचं समिकरण  

By बाळकृष्ण परब | Updated: March 2, 2023 17:54 IST

Assembly by Election Results: कसबा आणि् चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

- बाळकृष्ण परब सध्याच्या राजकीय उलथापालथीमध्ये राज्यातील राजकारणासाठी महत्त्वाच्या असलेल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं होतं. या पोटनिवडणुकीतील निकालामध्ये भाजपाला पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात दारुण पराभव पत्करावा लागला आहे. इथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी बाजी मारली आहे. तर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीचा लाभ झाल्याने भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप ह्या विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. दरम्यान, या दोन मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकांमधून दोन पॅटर्न स्पष्टपणे दिसून आले आहेत. त्या पॅटर्नचा भाजपा व शिंदेंची शिवसेना आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्यात विभागलेल्या महाष्ट्रातील राजकारणावर आणि पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांवरही ठळक परिणाम होताना दिसणार आहे. 

यातील पहिला पॅटर्न दिसून आला तो पुण्यातील कसबा मतदारसंघात. हा मतदारसंघ भाजपाचा पारंपरिक बालेकिल्ला. एक दोन अपवाद वगळता गेल्या ४०-४५ वर्षांत येथे भाजपाचा पराभव झाला नव्हता. मात्र ही पोटनिवडणूक त्याला अपवाद ठरली. येथे सहानुभूतीची लाट असण्याची शक्यता विचारात न घेता भाजपाने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी न देता ती हेमंत रासनेंना दिली. तर प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीकडून काँग्रेसने रवींद्र धंगेकरांच्या रूपात तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार दिला. एवढंच नाही तर संपूर्ण प्रचारामध्ये महाविकास आघाडीमध्ये कमालीचं ऐक्य दिसून आलं. वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडूनही शिस्तबद्ध प्रचार झाला. तसेच विविध माध्यमातून भाजपाविरोधात वातावरणनिर्मिती करण्यातही महाविकास आघाडी आणि काँग्रेसला यश आलं. त्यामुळे ही निवडणूक भाजपाला जड जाणार असं सुरुवातीपासूनच दिसत होतं. अखेर तसंच घडलं.

दुसरीकडे भाजपाच्या गोटात मात्र सुरुवातीपासूनच गोंधळ दिसून आला. अगदी उमेदवार निवडीपासून या गोंधळाला सुरुवात झाली होती. सहानुभूतीचा लाभ घेण्यासाठी टिळक कुटुंबात उमेदवारी द्यायची का, याचाही विचार झाला. मात्र अखेरीस रासनेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले. मात्र त्यामुळे सहानुभूतीचा मुद्दा या निवडणुकीतून निघून गेला. तसेच भाजपाच्या पारंपरिक मतदारांत नाराजीचं वातावरण निर्माण झालं. ते दूर करण्याचे सकारात्मक प्रयत्न झाले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून भाजपाच्या मतदारांचं मतदान कमी झाल्याचंही दिसून आलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि इतर नेत्यांनी केलेल्या आक्रमक प्रचारामुळे भाजपा बॅकफूटवर गेल्याचे चित्र होते. त्यात गिरीश बापट यांना आजारी असताना प्रचारासाठी आणल्याचा मुद्दा विरोधकांनी आक्रमकपणे भाजपाविरोधात वापरला. तसेच मतदानादिवशी झालेले गैरप्रकारांचे आरोप आणि धंगेकरांचे उपोषण यामुळेही भाजपाच्या विरोधात वातावरणनिर्मिती झाली. अखेरीस या सर्वाचा फायदा घेत धंगेकर विजयी झाले. त्यांच्या विजयामुळे भाजपाविरोधात प्रबळ उमेदवार देऊन, शिस्तबद्ध प्रचार करत परस्परात ऐक्य राखले तर भाजपाला पराभूत करता येते, हे या पॅटर्नमधून दिसून आले. 

या पोटनिवडणुकीतील दुसरा पॅटर्न दिसून आला तो पिंपरी चिंचवड मतदारसंघामध्ये. पिंपरी-चिंडवडणमधील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली. या मतदारसंघात सहानुभूतीच्या लाटेचा विचार केला गेला. तसेच अपेक्षेप्रमाणे अश्विनी जगताप यांनी येथे ३० हजारांहून अधिक मताधिक्यासह विजयी आघाडी घेतली आहे. मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांच्याविरोधात राहुल कलाटे यांनी केलेली बंडखोरीही निर्णायक ठकताना दिसत आहे. तसेच कलाटे यांच्या बंडखोरीमुळे मतविभाजन होऊन निकालाला कलाटणी मिळाल्याचे आकडे समोर येत आहेत. ३३ व्या फेरीच्या आकडेवारीपर्यंत पाहिल्यास अश्विनी जगताप यांना १ लाख २५ हजार १३० मते मिळाली आहेत. तर नाना काटे यांना ९१ हजार २१६ आणि राहुल कलाटे यांना ४० हजार ५०७ मते मिळाली आहेत. या आकडेवारीचा विचार केल्यास कलाटेंनी बंडखोरी केली नसती तर या मतदारसंघातही कसब्याप्रमाणेच निकाल लागला असता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कदाचित अश्विनी जगताप जिंकल्या असत्या तरी त्यांना मोठं मताधिक्य मिळालं नसतं.

त्यामुळे चिंचवडमधील हा पॅटर्न पुढच्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीसाठी अडचणीचा ठरू शकतो. त्याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांसोबत इतक काही छोटे मोठे पक्ष असल्याने या सार्वत्रिक निवड़णुकांच्या वेळी अनेक इच्छुकांना उमेदवारी नाकारली जाणे अपरिहार्य ठरणार आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीला उत येण्याची दाट शक्यता आहे. त्यातच मतविभाजन घडवून निकालावर प्रभाव पाडू शकतील अशा बंडखोरांना भाजपाकडून पाठबळ मिळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे आतापर्यंत पुढील निवडणुका एकत्र ल़ढण्याची रणनीती आखणाऱ्या महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे आजच्या निकालांमुळे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणावर फार मोठा परिणाम होणार नाही. मात्र हे दोन पॅटर्न पुढच्या काही काळासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे ठरतील, एवढं नक्की!

टॅग्स :kasba-peth-acकसबा पेठchinchwad-acचिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस