‘कास पठार’ रस्त्यावर दरड कोसळली !
By Admin | Updated: July 2, 2016 12:12 IST2016-07-02T12:12:52+5:302016-07-02T12:12:52+5:30
शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कास पठाराकडे जाणा-या यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली.

‘कास पठार’ रस्त्यावर दरड कोसळली !
>सातारा, दि. २ - शुक्रवारी रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम घाटात दाणादाण उडाली असून अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. कास पठाराकडे जाणा-या यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी दरड कोसळल्यामुळे काही काळ वाहतूकही ठप्प झाली.
सध्या कास पठारावर फुले उमलली नसली तरी दर शनिवारी-रविवारी सह्याद्रीचं अनोखे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पुण्या-मुंबईचे शेकडो पर्यटक धाव घेत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कास पठार परिसरातील ओढे, नाले लाल मातीच्या रंगाने फेसाळू लागले आहेत. अनेक धबधबेही कोसळण्यास सुरूवात झाली आहे.
हा पाऊस भात लागणीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. भात शेतीच्या शिवारात पाणी साचल्यामुळे डोंगरावरील शेतक-यांची आता लगबग सुरू झाली आहे. दरम्यान, पश्चिम घाटातील कोयना, उरमोडी, कण्हेर, धोम-बलकवडी अन वीर धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढत चालला आहे. (प्रतिनिधी)