शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
3
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
4
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
5
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
6
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
7
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
8
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
9
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
10
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
11
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
12
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
13
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
14
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
15
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
16
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
17
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
18
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

कर्नाटकने रोखला सीमावर्ती भागाचा निधी!, विधानपरिषदेत गदारोळानंतर कामकाज तहकूब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 08:46 IST

कर्नाटक सरकारचा मस्तवालपणा रोखायलाच हवा, मराठी अस्मितेवर वारंवार घाला घातला जात असताना सरकार गप्प का, असा सवाल करीत विरोधकांनी बोम्मई सरकारविरोधात विधान परिषदेत जोरदार घोषणा दिल्या. 

मुंबई : सीमाभागातील ८६५ गावांना महाराष्ट्र सरकारने दिलेला ५४ कोटी रुपयांचा आरोग्यनिधी रोखला आहे. मानवतेच्या दृष्टीने हा निधी कोणी रोखू शकत नाही. कर्नाटक सरकारचा मस्तवालपणा रोखायलाच हवा, मराठी अस्मितेवर वारंवार घाला घातला जात असताना सरकार गप्प का, असा सवाल करीत विरोधकांनी बोम्मई सरकारविरोधात विधान परिषदेत जोरदार घोषणा दिल्या. 

सत्ताधाऱ्यांकडूनही कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करताना विरोधकांनी राजकारण करू नये, असे आवाहन करण्यात आले. कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कामकाज दहा मिनिटे तहकूब केले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २८९ च्या प्रस्तावाअंतर्गत कर्नाटक सरकारने आरोग्यनिधी रोखल्याचा विषय उपस्थित केला.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून निधी रोखण्याची करण्यात आलेली भाषा अतिशय गंभीर आहे. कर्नाटक सरकार अडवणुकीची आणि मुजोरीची भाषा करत असेल तर त्यांना त्याच ताकदीने उत्तर दिले पाहिजे, अशी मागणी दानवे यांनी केली. जयंत पाटील, एकनाथ खडसे, मनीषा कायंदे, विक्रम काळे यांनी निषेध व्यक्त केला. 

महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्नकर्नाटक सरकार मराठी भाषकांवर जाणूनबुजून अन्याय, अत्याचार करत आहे. कर्नाटकमध्ये येत्या काही दिवसांत निवडणुका होणार असल्याने महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. हे गांभीर्याने घ्यावे आणि राज्य सरकार सीमावर्ती भागांतील मराठी माणसांबरोबर आहे, हा संदेश जावा,  यासाठी निषेध म्हणून सभागृह तहकूब करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते एकनाथ खडसे यांनी केली. कर्नाटक सरकारला ठोस उत्तर देणार की नाही, असा प्रश्न मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला. विक्रम काळे यांनीही राज्य सरकार गतिमान भूमिका का घेत नाही, असा सवाल केला.

रहिवाशांना मदत करणारच!  - विरोधकांच्या भावनांशी राज्य शासन सहमत आहे. सीमावर्ती भागांतील रहिवाशांना मदत देण्यास सरकार कुठेही मागे राहणार नाही. - मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून सहा महिन्यांत दोन वेळा कर्नाटक भागात गेलो. अनेक सोयीसुविधा दिल्या, कॅम्प भरवले. - सर्वांनी एकत्रितपणे मराठी बांधवांच्या मागे उभे राहायला हवे, असे आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केले. 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाKarnatakकर्नाटक