शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

karnataka winter session2022: सीमाप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी मांडला निषेधाचा ठराव, महाराष्ट्र एकीकरण समितीवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 18:17 IST

..तर कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही 

प्रकाश बेळगोजीबेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गेल्या १५-२० दिवसांपासून तणाव वाढला असून आज बेळगावमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निषेधाचा ठराव मांडला.महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा वादच आता उरला नसून कर्नाटकातील सीमाभागात सर्वकाही सुरळीत चालल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सीमा बदलण्याचा अधिकार फक्त संसदेला असून सुप्रीम कोर्टाला नसल्याचे सांगत राज्य पुनर्र्चना झाली. त्यावेळी सीमेवरील नोकरदारांच्या प्रतिक्रिया घेऊन प्रांतरचनेला प्राधान्य देण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी महाजन अहवालाचे तुणतुणे वाजवले. महाराष्ट्र एकीकरण समिती ज्या उद्देशाने स्थापन करण्यात आली होती तो उद्देश आता बाजूला हटला असून समितीला आता कुणाचाही पाठिंबा नसल्याची जहरी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले अधिवेशन सुरु असताना महामेळावा आणि राज्योत्सव दिनावेळी काळा दिन या दोन गोष्टी येथील परंपरा झाल्याचे सांगत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. यापूर्वीदेखील अधिवेशनादरम्यान येथील स्थानिक आमदार सभागृहात सर्वांची भेट घ्यायचे आणि सभागृहाबाहेर जाऊन पुन्हा सीमावासीयांशी एकरूप व्हायचे त्यामुळे हि येथील परंपरा झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. येथील जनता आता महाराष्ट्र एकीकरण समितीचा तिरस्कार करू लागली असून महाराष्ट्रातील नेते सीमाभागातील वातावरण बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रातील नेतेमंडळीमुळे कायदा-सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कर्नाटकात कार्यक्रमाच्या निमित्ताने येणारे महाराष्ट्रातील मंत्र्यांना आम्ही अडवलं. महाराष्ट्रातील नेतेमंडळी रंग बदलत असून येथील कायदा - सुव्यवस्था त्यांच्यामुळेच बिघडत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच महाराष्ट्राच्या नेत्यांकडून वारंवार होणाऱ्या विधानांचाही निषेध करत संजय राऊत, जयंत पाटील यांच्यावर टीका केली. मुकुल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली पाच वकिलांची समिती केंद्रीय गृहमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत कायदा - सुव्यवस्था अबाधित राखणे, दोन्ही राज्यात सलोखा राखणे, येथील समस्यांवर समन्वयाने तोडगा काढणे अशा सूचना देण्यात आल्या असून सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू मांडण्यासाठी मुकुल रोहितगी यांच्या नेतृत्वाखाली पाच वकिलांची समिती स्थापन करण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात कर्नाटकाची बाजू समर्थपणे मांडण्यासाठी आपण तयार असून सीमा आणि जल विवादासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ..तर कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही राज्य पुनर्र्चना आयोग आणि संविधानावर आपला विश्वास असून कर्नाटकाची बाजू भक्कम असून कर्नाटकातील जनतेचे हीत जोपासण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुन्हा एकदा आपण कर्नाटकाची एक इंचही जागा देणार नसल्याच्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. यापुढील काळात कर्नाटकाकडे कुणीही वक्रदृष्टीने पाहिल्यास कोणत्याही गोष्टीची पर्वा केली जाणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्तनाचा निषेध करणारा निषेध ठराव मांडला आणि सदर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक