कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप
By Admin | Updated: April 25, 2016 21:06 IST2016-04-25T20:46:09+5:302016-04-25T21:06:43+5:30
मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही

कर्नाळा - अचानक बसने घेतला पेट, सर्व प्रवाशी सुखरुप
ऑनलाइन लोकमत
कर्नाळा, दि. २५ - मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागली त्यावेळी एसटी बसमध्ये ५१ प्रवासी होते. त्यात तीन लहान मुलांचाही समावेश होता. बसला आग लागल्याचे प्रथम बस चालकाच्या लक्षात आले.
अपघाताबाबत अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवण्यात आले. बस जळून खाक झाली तरी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले नव्हते. या घटनेनंतर कर्नाळामार्गावरची दोन्ही बाजूंची वाहतूक बंद पडली होती.
अपघातग्रस्त एसटी बसमधील प्रवाशांना पर्यायी बस पनवेल डेपोमधून पाठवत असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असून या घटनेची चौकशी करण्यात येईल असेही आश्वासन दिले. मात्र एसटी बसला वारंवार अशा पद्धतीने अचानक आग कशी काय लागते असा सवाल विचारला जात आहे.