शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे दीड वर्ष खोळंबले, कर्जतच्या तरुणाने अखेर अमेरिकेत बांधली ऑनलाइन लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 05:59 IST

अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले असून, अमेरिकेतही उच्च शिक्षण घेतले आहे. कोरोनामुळे मुंबईतील विवाह झाला सिॲटलमध्ये: कुटुंबाची लाइव्ह उपस्थिती

नेरळ : कोरोना साथीच्या वावटळींनी दैनंदिन जीवन प्रभावित केलेच, तर अनेकांचे विवाहही खोळंबले. त्यातल्या काहींनी बँडबाजा, वरातीला बगल देत मोजक्याच वऱ्हाडींच्या उपस्थितीत कसेबसे आपले विवाह उरकून घेतले. अशात कर्जत तालुक्यातील एका नवरदेवाच्या लग्नाची गोष्ट चर्चेत आली आहे. परदेशात असलेल्या वधू आणि वराचे भारतात ठरलेले लग्न कोरोनाने वाट अडविल्याने त्यांनी अमेरिकेत पार पाडले. ऑनलाइन उपस्थिती लावत  मुंबईतील वऱ्हाडी मंडळींनी अक्षता टाकून वधूवरांना आशीर्वाद दिले.

कर्जत तालुक्यातील वंजारवाडी येथील रहिवासी आणि मुंबईत पोलीस निरीक्षक पदावर रुजू असलेले अनिल थोरवे यांचा मुलगा अजय आणि त्याची केरळ येथील वर्गमैत्रीण श्रीनिधी श्रीनिवास राघवन यांचे सुमारे दीड वर्षापासून लग्न ठरले होते. अजय व श्रीनिधी या दोघांनी मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनीअरिंग केले असून, अमेरिकेतही उच्च शिक्षण घेतले आहे.  दोघेही प्रसिद्ध कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत.

कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर २ एप्रिल २०२० रोजी त्यांनी मुंबईत विवाह समारंभ पार पाडण्याचे ठरवले होते. त्यासाठी हॉटेलही बुक केले होते. मात्र कोरोनामुळे अमेरिकेहून विमानांची वाहतूक बंद झाल्याने त्यांचे लग्न १७ मे रोजी मुंबईत करण्याचे ठरले. त्या वेळीही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या नियोजनावर पाणी फिरविले. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधांनी वाट अडविल्याने दोघांना भारतात येणे अवघड झाले. म्हणून दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे लग्न अमेरिकेतच करण्याचा निर्णय घेत भारतातून ऑनलाइन हजेरी लावण्याचे निश्चित केले. सिॲटल येथे १६ मे २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजता दोघांच्या २० मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह पार पडला. दोघांच्याही कुटुंबीयांना आनंद झाला असला तरीही त्यांच्या लग्नात प्रत्यक्ष उपस्थित राहू न शकल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या