करण जोहर मिसेस फवाद खान, गायक अभिजितने डिवचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 13:19 IST2016-10-03T13:09:06+5:302016-10-03T13:19:28+5:30
अभिजित भट्टाचार्यने ट्विटरवर करण जोहरचा उल्लेख फवादची बायको असा करत, त्या दोघांचे संबंध देखील जोडले आहेत.

करण जोहर मिसेस फवाद खान, गायक अभिजितने डिवचले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.3- आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे गायक अभिजित भट्टाचार्य नेहमी चर्चेत असतो. यावेळी त्याने दुसरे-तिसरे कुणाला नाही तर थेट दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला टार्गेट केले आहे. करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्याने सिनेमा वादात अडकला आहे. यामुळे या सिनेमावर चौफेर टीका होत आहे. हाच धागा पकडत अभिजित भट्टाचार्यने ट्विटरवर करण जोहरचा उल्लेख 'फवादची बायको' असा करत, त्या दोघांचे संबंध देखील जोडले आहेत.
''आणखी एक लव्ह जिहाद... मेहबूबा करण जोहर नैराश्यात... पाकिस्तानी लव्हर फवादने धोका दिला, बिच्चारी मिसेस करण जोहर-खान..'' अशा आशयाचे ट्विट करत अभिजितने करणला डिवचले आहे. काही दिवसांपूर्वी करणने त्याचा प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या येणा-या सिझनसंदर्भात ट्विट केले होते. या चॅट शोमधील पहिला गेस्ट फवाद खान नसणार आहे, असं देखील त्याने स्पष्ट केले होते. यावर कमेंट करताना अभिजितने ही बोचरी टीका केली आहे. अभिजितच्या या ट्विटला करण जोहर कशा पद्धतीने उत्तर देणार, हे आता पाहावे लागणार आहे.
Another #lovejihad .. Mehbooba #KaranJohar is in depression ..pak lover fawad ditched bechari Mrs @karanjohar khan https://t.co/WdYQGoEeuq
— abhijeet (@abhijeetsinger) October 2, 2016
दरम्यान, उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मनसेसहीत शिवसेनेनेही पाकिस्तानी कलाकार असलेल्या 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'सारख्या सिनेमांना विरोध केला आहे. त्यामुळे आता हे सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार की नाही, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.