शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 4, 2025 23:44 IST

खाेदलेल्या साईडपट्टीच्या अरुंद रस्त्यावर कराड-लातूर एसटी बस उलटली

राजकुमार जाेंधळे

लातूर - सातारा जिल्ह्यातील कराड स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता लातूरकडे मार्गस्थ झालेली बस लातूरनजीक रामेगाव पाटी येथे बुधवारी रात्री ८ वाजता उलटली. या अपघातात बसमधील ७० प्रवाशांपैकी १७ प्रवासी जखमी झाले असून, ५३ जण सुखरुप आहेत. खाेदलेल्या साईडपट्टीमुळे अरुंद रस्त्यावर निसरड्या ठिकाणावरुन बस अलगद उलटल्याने बहुतेकांना इजा झाली नाही.

घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना रुग्णवाहिकेतून लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. लातूर-बार्शी महामार्गाचे सध्या काम सुरु आहे. तेथून लातूर अवघ्या १५ किलाेमीटर अंतरावर असताना रस्त्यालगतच्या खाेदकामाचा अंदाज अनेक वाहनांना येत नाही. शिवाय, रस्त्यालगत दिशादर्शक फलक, चिन्हेही ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे बसचालकाला अंदाज न आल्याने बस अचानक उलटली. बसचा वेग कमी असल्याने फारशी हानी झाली नाही. रस्त्यावरुन जा-ये करणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने थांबवत घटनास्थळाकडे धाव घेतली. रात्रीची वेळ असल्याने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा आराडाओरडा सुरु हाेता. नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत बसचा समाेरील आणि पाठिमागील काच फाेडून आत प्रवेश केला आणि एका-एका प्रवशांना बाहेर काढले.

दाेन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल...बस उलटल्यानंतर काहींनी बसमधील प्रवशांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी रुग्णवाहिकेला घटनास्थळी बाेलावण्यासाठी प्रयत्न केले. काही वेळात दाेन रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल झाल्या. बसमधील जखमी प्रवाशांना उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल केले. १७ जखमींची नावे आणि ओळख पटविण्याचे काम रुग्णालयात सुरु हाेते.

बसचा वेग कमीच हाेता...लातूर-बार्शी महामार्गाचे काम सुरु आहे. काही ठिकाणी रस्त्याचे खाेदकाम केले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यालगत खाेदकाम केले आहे. याचा अंदाज घेत मी बसचा वेग कमी केला हाेता. मात्र, अंधार असल्याने रस्त्याचा अंदाज आला नाही. शिवाय, रस्त्यालगत दिशादर्शक फलक नसाल्याने बस रस्त्यावरच उलटली. - सदानंद माराेती लाेंढे, बसचालक

बसच्या काचा फाेडून बाहेर काढले...कराड-लातूर बसमधून मी प्रवास करत हाेते. चालकाच्या पाठीमागेच मी बसले हाेते. दरम्यान, बस उलटल्यानंतर अचानक माेठा आवाल आला. काहीच कळले नाही. मी घाबरुन गेले. नेमके काय झाले आहे, हे काही वेळ समजले नाही. बसमध्ये एकच गाेंधळ, आरडाओराडा सुरु झाला. काहींनी बसच्या काचा फाेडून आम्हाला बाहेर काढले. - पायल कठारे, बसमधील प्रवासी (रा. लातूर)

टॅग्स :Accidentअपघातstate transportएसटी