बलात्कार फसल्याने केली तनुश्रीची हत्या

By Admin | Updated: August 23, 2016 03:09 IST2016-08-23T03:09:52+5:302016-08-23T03:09:52+5:30

तनुश्री डोलाई हिची एका अल्पवयीन मुलाने केलेली हत्या चोरीसाठी नव्हे तर बलात्कार करण्याच उद्देशानेच करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले

Kannu Tanushree murdered with rape | बलात्कार फसल्याने केली तनुश्रीची हत्या

बलात्कार फसल्याने केली तनुश्रीची हत्या


विरार : नालासोपाऱ्यातील तरुण विवाहित महिला तनुश्री डोलाई हिची एका अल्पवयीन मुलाने केलेली हत्या चोरीसाठी नव्हे तर बलात्कार करण्याच उद्देशानेच करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा वैद्यकीय अहवाल आणि परिस्थितीजन्य पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा प्रयत्नाचे कलम जोडले आहे.
नालासोपाऱ्यातील डीडी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या तनुश्री डोलाई (२३) या महिलेची ९ जुलै रोजी तिच्या दहा महिन्यांच्या बाळासमोरच हत्या झाली होती. पोलिसांनी तनुश्रीच्या शेजारी राहणाऱ्या १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणाला लगेचच अटक केली होती. चोरीच्या उद्देशाने ही हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते.
मात्र. याप्रकरणात पोलिसांना संशय असल्याने त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता हत्येपूर्वी तनुश्रीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपीवर बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या दिवशी दीडतास आरोपीबरोबर मयत तनुश्रीची झटापट सुरू होती. त्याने बलात्काराचा प्रयत्न केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे सापडले आहेत. त्यामुळे त्याच्यावर नवीन कलमे दाखल केली आहेत.
दरम्यान, मयत तनुश्री ही पती आणि तान्ह्या बाळासह या इमारतीत राहत होती. आ़रोपी १७ वर्षांचा तरूण असून तो तिच्याच शेजारी राहतो. घटनेच्या दिवशी संध्याकाळी तनुश्री घरात एकटी असल्याचे पाहून आरोपी बलात्काराच्या उद्देशाने घरात गेला होता. परंतु तनुश्रीने प्रतिकार करताच त्याने तिचा गळा चिरला. हत्या चोरीसाठी झाल्याचे दिसावे यासाठी तिचा मोबाईल आणि सोनसाखळी त्याने लंपास केली. नंतर तो गर्दीत जाऊन उभा राहिला, पोलिसांना त्याच्या घरात रक्ताचा एक थेंब आढळल्याने अवघ्या दोन तासात त्याला अटक केली. मोबाईल फोनसाठी हत्या केल्याचे सांगून पोलिसांची दिशाभूल केली होती. मात्र, पोलिसांना याप्रकरणात संशय आल्याने तंनी वैद्यकी तपासणी केली. त्यात आरोपीने बलात्कारासाठीच हत्या केल्याचे उजेडात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Kannu Tanushree murdered with rape