कन्नडीगांची पुन्हा आगळीक
By Admin | Updated: July 30, 2014 01:53 IST2014-07-30T01:53:29+5:302014-07-30T01:53:29+5:30
महाराष्ट्राच्या सीमा भागात ध्वज रोवण्याचा प्रय} करणा:या कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या दहा कार्यकत्र्यानापोलिसांनी अटक केली.

कन्नडीगांची पुन्हा आगळीक
मारुती कदम
- उमरगा (जि. उस्मानाबाद)
महाराष्ट्राच्या सीमा भागात ध्वज रोवण्याचा प्रय} करणा:या कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या दहा कार्यकत्र्यानापोलिसांनी अटक केली. उमरगा तालुक्यातील तलमोड गावाजवळ मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर येथे मराठी भाषकांचा ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ या फलकाचा वाद सुरू आहे. येळ्ळूरचा समावेश महाराष्ट्रात करावा, अशी या भागातील मराठीभाषकांची मागणी आहे. याला प्रत्युत्तर देण्यासाठी सीमावर्ती भागातील मराठीभाषक गावांचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी कर्नाटक रक्षणा वेदीका करीत, या मागणीसाठी बिदर जिल्ह्यातील भालकी, हुमनाबाद, शहाजानी औराद, परतापूर, मंठाळसह आदी भागांतील कार्यकत्र्यानी सीमावर्ती भागात येण्याचा प्रय} केला.
मंगळवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बिदर जिल्ह्यातील संघटनेचे शेकडो कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात येणार असल्याची माहिती कर्नाटक पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार डी.एस.पी. अमरनाथ रेड्डी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. हुल्लर यांच्यासह कर्नाटक राखीव पोलीस दलाच्या दोन तुकडय़ा जिल्हा पोलीस दलाच्या तुकडय़ा असा दीडशे पोलिसांचा ताफा कर्नाटक सीमेवर तैनात करण्यात आला होता.
दुपारी 12च्या सुमारास कार्यकत्र्यानी महाराष्ट्राच्या सीमेत ध्वज फडकाविण्याचा प्रय} केला. या वेळी 1क् कार्यकत्र्याना अटक करण्यात आली. अन्य दोन जीप गाडय़ांसह चार कार्यकत्र्यानी पलायन केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. हुल्लर यांनी सांगितले. या प्रकारामुळे सीमाक्षेत्रतील मराठी जणांच्या भावना दुखावल्या असुन सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
अनेक गावांतील ‘महाराष्ट्र राज्य’चे फलक काढले
बेळगाव : येळ्ळूर गावात रविवारी पोलिसांनी हैदोस घातल्यानंतर मंगळवारी तिस:या दिवशी येळ्ळूरमधील जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मात्र, तरीही लोकांच्या मनात भीती कायम आहे. पोलीस अटक करतील, या भीतीने अनेक तरुणांनी गाव सोडले आले. तर दुसरीकडे बेळगाव तालुक्यातील अनेक गावांत लावण्यात आलेले ‘महाराष्ट्र राज्य’ फलक पोलिसांनी काढून टाकले आहेत.
येळ्ळूर गावात मंगळवारी रस्त्यांवर वर्दळ दिसत होती. मात्र अजूनही आजूबाजूच्या गावांतील बससेवा सुरू झालेली नाही; त्यामुळे बेळगावला येणा:या जाणा:यांची गैरसोय होत आहे. येळ्ळूरच्या ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन करतानाच आमदार संभाजी पाटील यांनी, पोलिसांच्या अमानुष लाठीहल्ल्याच्या विरोधात कर्नाटक मानव आयोगाकडे दाद मागणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
च्सीमावर्ती भागातील मराठीभाषक गावांचा समावेश कर्नाटकात करावा, अशी मागणी कर्नाटक रक्षणा वेदीका या संघटनेने केली.
च्या मागणीसाठी बिदर जिल्ह्यातील भालकी, हुमनाबाद, शहाजानी औराद, परतापूर, मंठाळसह आदी भागातील कार्यकत्र्यानी सीमावर्ती भागात येण्याचा प्रय} केला.
कर्नाटक रक्षणा वेदीकेच्या कार्यकत्र्यानी सीमावर्ती
भागात ध्वज फडकाविण्याचा प्रय} केला. मात्र, पोलिसांनी हा प्रय} हाणून पाडत कार्यकत्र्याना ताब्यात घेतले. त्यानंतर तलमोडनजीकच्या चेकनाक्यावर असा पोलीस बंदोबस्त होता.