कणकवलीत 18 तोळे सोन्यावर चोरांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2016 21:40 IST2016-09-01T21:40:22+5:302016-09-01T21:40:22+5:30
कणकवली बसस्थानकात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे.

कणकवलीत 18 तोळे सोन्यावर चोरांचा डल्ला
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. 1 - कणकवली बसस्थानकात पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आली आहे. गणेशोत्सवानिमित्तानं दहिसरहून राज्यराणी एक्स्प्रेसनं घोंगळे दाम्पत्य कणकवली आले. त्यानंतर कळसुली या स्वतःच्या गावी एसटीनं जाण्यासाठी घोंगळे दाम्पत्य निघाले असताना एसटीत चढत असताना अज्ञातांनी पर्समध्ये सोन्याचे दागिने ठेवलेली डबी चोरली. त्या डबीत 18 तोळे सोने होते. सोन्याची अंदाजे किंमत 5 लाख 4 हजारांच्या घरात आहे. घोंगळे दाम्पत्यासोबत एसटीत चढलेल्या 3 महिलांना हे दागिनं लंपास केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या महिलांना बस स्थानकानजीक असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उतरून पोबारा केला आहे.