‘कन्हैया कुमारला पुण्यात आणणारच’
By Admin | Updated: March 28, 2016 08:30 IST2016-03-28T02:02:50+5:302016-03-28T08:30:32+5:30
शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट जॉइन्ट फोरम’ची स्थापना केली असून परीक्षा संपल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा

‘कन्हैया कुमारला पुण्यात आणणारच’
पुणे : शहरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनी ‘स्टुडंट जॉइन्ट फोरम’ची स्थापना केली असून परीक्षा संपल्यानंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारचा पुण्यात कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. याबाबतची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शैक्षणिक वर्तुळातील राजकीय दडपशाहीचा फोरमच्या सदस्यांनी निषेध केला. आम्ही कन्हैयाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करतो. त्याला पुण्यात आणण्यासंदर्भात २८ मार्चला आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनशी चर्चा करणार असल्याचे भूषण राऊत याने सांगितले.
जेएनयू, अलाहाबाद विद्यापीठ आणि जाधवपूर विद्यापीठातील दडपशाहीला आमचा विरोध आहे. मुक्त वातावरणासाठी शासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी असल्याचे कल्याणी माणगांव हिने सांगितले.
ओबीसी शिष्यवृत्त्या बंद केल्या असून काही शिष्यवृत्त्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. मात्र शासनाने आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या सुरू कराव्यात, अशी मागणी हर्षल लोहकरे याने
केली. (प्रतिनिधी)